५१० अस्थायी तलाठ्यांना पाच महिन्यांची मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2020 04:25 PM2020-04-14T16:25:31+5:302020-04-14T16:25:50+5:30

आॅगस्ट २०२० पर्यंत तात्पुरत्या स्वरुपात मुदतवाढ देण्यात आली.

Five-month extension to temporary Talathi | ५१० अस्थायी तलाठ्यांना पाच महिन्यांची मुदतवाढ

५१० अस्थायी तलाठ्यांना पाच महिन्यांची मुदतवाढ

googlenewsNext

वाशिम : अमरावती विभागात तलाठ्यांची एकूण २३२६ पदे मंजूर असून, १८०६ पदे स्थायी स्वरुपात भरण्यात आली आहेत. उर्वरीत ५२० पदे अस्थायी असून, त्यांची मुदत मार्च २०२० मध्ये संपली. या तलाठ्यांना एप्रिल महिन्यापासून पूर्ववत केले असून, आॅगस्ट २०२० पर्यंत तात्पुरत्या स्वरुपात मुदतवाढ देण्यात आली.
महसूल विभागाचा कणा म्हणून तलाठ्यांची ओळख आहे. गावपातळीवर महसूलविषयक कामांची जबाबदारी तलाठ्यांवर सोपविली जाते. तलाठी संवर्गातील अनेक पदे रिक्त असल्याने या पदांचा प्रभार कार्यरत तलाठ्यांकडे सोपविला जातो तर काही ठिकाणी अस्थायी स्वरुपात तलाठ्यांची पदे भरली जातात. अमरावती विभागात तलाठ्यांची एकूण मंजूर पदे २३२६ अशी आहेत. यापैकी ५२० पदे रिक्त असनू, सदर पदे ही अस्थायी स्वरुपात भरण्यात आली आहे. या ५२० तलाठ्यांची मुदत ३१ मार्च २०२० रोजी संपली असून, एप्रिल २०२० या महिन्यापासून या तलाठ्यांना पुढील पाच महिन्यांसाठी अर्थात आॅगस्ट २०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. यामध्ये अमरावती जिल्ह्यातील १३१, अकोला जिल्ह्यातील ७१, यवतमाळ जिल्ह्यातील १४३, वाशिम जिल्ह्यातील ६०, बुलडाणा जिल्ह्यातील ११५ तलाठ्यांचा समावेश आहे.
 

 
वाशिम जिल्ह्यात २८८ पदे मंजूर असून, २२८ पदे भरण्यात आली तर उर्वरीत ६० तलाठी अस्थायी आहेत. महसूल विभागाने अस्थायी स्वरुपातील तलाठ्यांना आॅगस्ट २०२० पर्यंत मुदतवाढ दिली असून, शासन निर्णयानुसार पुढील कार्यवाही केली जाईल.
- शैलेश हिंगे, निवासी उपजिल्हाधिकारी वाशिम

Web Title: Five-month extension to temporary Talathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.