वाशिम जिल्ह्यात आणखी पाच कोरोना ‘पॉझिटीव्ह’: रुग्णसंख्या २६
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2020 11:03 AM2020-06-12T11:03:56+5:302020-06-12T11:04:07+5:30
पाच जणांचे कोरोनाविषयक अहवाल पॉझिटीव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्हा आरोग्य विभागास गुरुवारी ३३ जणांचे कोरोनाविषयक अहवाल प्राप्त झाले. यापैकी पाच जणांचे कोरोनाविषयक अहवाल पॉझिटीव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली.
पॉझिटीव्ह आलेल्या अहवालात बोराळा हिस्से (ता. वाशिम) येथील एका ५६ वर्षीय व्यक्तीसह, दिल्ली येथून सुकळी (ता. कारंजा लाड) येथे आलेल्या व 'आयएलआय' लक्षणे असलेल्या एकाच कुटुंबातील ३२ वर्षीय पुरुष, २४ वर्षीय महिला व २ वर्षीय बलिकेचा अहवाल 'पॉझिटिव्ह' आला आहे. कारंजा लाड येथील एका ५३ वर्षीय व्यक्तीला सुद्धा कोरोना विषाणू संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या २६ झाली असून, त्यात १८ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
गुरुवार ११ जून रोजी जिल्हा आरोग्य विभागास ३३ अहवाल प्राप्त झाले. त्यात कारंजा तालुक्यातील बोराळा हिस्से (ता. वाशिम) येथील एका ५६ वर्षीय व्यक्तीचा कोरोनाविषयक अहवाल आज 'पॉझिटिव्ह' आला आहे. सदर व्यक्ती बोराळा हिस्से येथील कोरोनाबाधित युवकाच्या संपर्कात आला होता. त्याशिवाय दिल्ली येथून सुकळी (ता. कारंजा लाड) येथे आलेल्या व 'आयएलआय' लक्षणे असलेल्या एकाच कुटुंबातील ३२ वर्षीय पुरुष, २४ वर्षीय महिला व २ वर्षीय बलिकेचा अहवाल 'पॉझिटिव्ह' आला आहे, तर कारंजा लाड येथील एका ५३ वर्षीय व्यक्तीला सुद्धा कोरोना विषाणू संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर व्यक्तीला कोरोना संसर्गांची लक्षणे असल्याने खासगी रुग्णालयाने 'रेफर' केले होते. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या २६ झाली असून, त्यात १८ जण अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
बुधवारी पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांच्या संपर्कात ४८ जण
बुधवारी ज्या सहा जणांचे कोरोनाविषयक अहवाल पॉझिटीव्ह आले. त्या सहा रुग्णांच्या ‘हायरिस्क’ संपर्कातील ४८ जणांचे अहवाल तपासणीस पाठविण्यात आले, तर गुरुवारी पॉझिटीव्ह आढळलेल्या पाच रुग्णांच्या ‘हायरिस्क’ संपर्कातील नागरिकांच्या माहितीचे संकलन आरोग्य विभागाने सुरू केले आहे. जिल्हा आरोग्य विभागास बुधवारी सहा जणांचे कोरोनाविषयक अहवाल पॉझिटीव्ह प्राप्त झाले. यापैकी चार जण हे बोराळा येथील कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कातील असून, यामध्ये निमजगा येथील तीन, वाशिम येथील एकाचा समावेश इसमाचा समावेश आहे. तसेच शेलुबाजार,शेमलाई येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. त्यामुळे निमजगा आणि शेमलाई ही गावे सील करण्यात आली, तर शेलुबाजारचा एक प्रभाग सील करून या तिन्ही ठिकाणच्या १४ हजार नागरिकांचे सर्वेक्षण आरोग्य विभागाने सुरू केले आहे, तर गुरुवारी कोरोनाविषयक अहवाल पॉझिटीव्ह आलेल्या पाच जणांच्या हायरिस्क संपर्कात आलेल्या लोकांची माहिती आरोग्य विभागाले सुरू केली असून, कारंजातील सुकळी ेगाव सील करून तेथे आरोग्य पथक दाखल करण्यात आले आहे. हे आरोग्य पथक पुढील १४ दिवस गावातील नागरिकांची तपासणी करणार आहे.