वाशिम जिल्हयात आणखी पाच जणांचा मृत्यू; ५६९ कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 11:57 AM2021-04-17T11:57:59+5:302021-04-17T11:58:14+5:30
Corona Cases in Washim : आणखी पाच जणांचा मृत्यू तर ५६९ जणांचा कोरोना चाचणी अहवाल १६ एप्रिल रोजी पॉझिटिव्ह आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्हयात कोरोनाचा कहर सुरूच असून, आणखी पाच जणांचा मृत्यू तर ५६९ जणांचा कोरोना चाचणी अहवाल १६ एप्रिल रोजी पॉझिटिव्ह आला. एकूण कोरोनाबाधितांचा आकडा २११७४ वर पोहोचला आहे.
जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने जिल्हावासियांची चिंताही वाढली आहे. शुक्रवारी प्राप्त अहवालानुसार आणखी पाच जणांचा मृत्यू झाला तसेच ५६९ जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. वाशिम शहरातील लाखाळा येथील ६, सामान्य रुग्णालय परिसरातील ५, सिव्हील लाईन्स येथील २, दत्त नगर येथील २, आययुडीपी कॉलनी येथील १२, मन्नासिंग चौक येथील १, पोस्ट आॅफिस जवळील १, निमजगा येथील १, पाटणी चौक येथील १, संत ज्ञानेश्वर नगर येथील १, शिव चौक येथील १, सिंधी कॅम्प येथील १, गव्हाणकर नगर येथील १, कारागृह निवासस्थान परिसरातील १, कत्तीपुरा येथील १, ड्रीमलँड सिटी परिसरातील १, अनसिंग येथील ७, गोंडेगाव येथील १, जांभरुण परांडे येथील २, कळंबा महाली येथील २, कार्ली येथील १, काटा येथील ३, केकतउमरा येथील १, माळशेलू येथील १, मोतसावंगा १, सोनखास येथील १, तोंडगाव २, वाई येथील १, वारा जहांगीर २, तांदळी १, किनखेडा १, मालेगाव शहरातील ५, बोराळा २, चांडस २, गौरखेडा येथील १, किन्हीराजा येथील ३, करंजी येथील १, पांगरखेडा येथील १, शिरपूर येथील १३, सोमठाणा येथील १, वसारी येथील ३, धमधमी येथील ७३, भेरा येथील १, सोनाळा येथील २, रिसोड शहरातील अमरदास नगर येथील १, चित्तरका गल्ली येथील ४, गजानन नगर येथील २, हिंगोली रोड परिसरातील १, जिजाऊ नगर येथील २, महात्मा फुले नगर येथील १, माणिक नगर येथील १, राम नगर येथील १, समर्थ नगर येथील २, शाहू नगर येथील १, एकता नगर येथील १, व्यंकटेश नगर येथील १, आसन गल्ली येथील २, सिव्हील लाईन्स येथील १, कासार गल्ली येथील १, कुंभार गल्ली येथील २, लोणी फाटा येथील १, शहरातील इतर ठिकाणचे १४, चिंचाबापेन येथील १, एकलासपूर २, गणेशपूर येथील १, घोटा ३, गोवर्धन २०७, जवळा ८, कळमगव्हाण १, करडा १, केनवड येथील ८, किनखेडा १, कोयाळी येथील २, लिंगा १, लोणी १, मांगवाडी येथील १, मोठेगाव येथील २, निजामपूर येथील १, पळसखेड २, पेडगाव येथील १, रिठद येथील ४, व्याड १, वाकद येथील १, येवती २, आंचळ १, बोरखेडी येथील १, भरजहांगीर १, मोरगव्हाण येथील १, पिंप्री सरहद येथील १, मंगरूळपीर शहरातील संभाजी नगर येथील २, आयडिया टॉवर जवळील १, शेलगाव रोड परिसरातील १, पंचशील नगर येथील १, हुडको कॉलनी येथील १, शहरातील इतर ठिकाणचे २, चेहल येथील १, हिरंगी येथील १, कासोळा येथील १, कवठळ येथील ५, मानोली येथील २, नवीन सोनखास येथील १, पेडगाव येथील ४, शेलूबाजार येथील ३, सोनखास येथील १, तऱ्हाळा येथील २, वसंतवाडी येथील १, वार्डा फार्म येथील २, येडशी येथील १, वनोजा येथील १, मोहगव्हाण येथील १, सावरगाव येथील २, कारंजा शहरातील अक्षय नगर येथील १, सेन्ट्रल बँक - १, इंदिरा नगर येथील १, माळीपुरा येथील १, मातोश्री कॉलनी येथील २, रंगारीपुरा येथील १, सिंधी कॅम्प येथील १, स्वस्तिक नगर येथील १, वनदेवी नगर येथील १, उपजिल्हा रुग्णालय - १, धामणी येथील २, जयपूर १, काजळेश्वर येथील ६, लोहगाव १, मनभा १, सुकळी येथील १, तुळजापूर १, लोहारा येथील १, मानोरा शहरातील मुंगसाजी नगर येथील ४, नाईक नगर १, समर्थ नगर येथील १, तहसील कार्यालय परिसर ३, अभयखेडा १, अजनी १, आमदरी ८, कोंडोली १, म्हसनी १, शेंदूरजना ३, तळप १, वरोली येथील २, पोहरादेवी ३, वसंत नगर १, गोंडेगाव १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. जिल्ह्याबाहेरील ६ बाधिताची नोंद झाली असून २६९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.