शिरपूर येथे आणखी पाच रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 05:08 AM2021-05-05T05:08:00+5:302021-05-05T05:08:00+5:30
००० मुंगळा परिसरातील रस्त्याची दुरवस्था वाशिम : मुंगळा परिसरातील ग्रामीण रस्त्याची दैनावस्था झाली आहे. इतर गावांना जोडणारे रस्ते दयनीय ...
०००
मुंगळा परिसरातील रस्त्याची दुरवस्था
वाशिम : मुंगळा परिसरातील ग्रामीण रस्त्याची दैनावस्था झाली आहे. इतर गावांना जोडणारे रस्ते दयनीय अवस्थेत आहेत. खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप आहे.
०००
अग्निशमन यंत्र बसविण्याकडे दुर्लक्ष
वाशिम : रिसोड, मालेगाव, वाशिम येथील शासकीय कार्यालये, बँका, ग्रामीण रुग्णालय यासोबतच काही खासगी रुग्णालयात आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी आवश्यक अशी अग्निशमन यंत्रे बसविलेली नाहीत, याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
००००
लोणी येथे आरोग्य पथक
वाशिम : रिसोड तालुक्यातील लोणी येथील आठ जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे ३ मे रोजी निष्पन्न झाले. खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य चमूने लोणी गाव गाठत कोरोनाबाधितांच्या संपर्कातील संदिग्ध रुग्णांची माहिती घेतली.
000
अरुंद रस्त्यावरून धावताहेत वाहने
वाशिम : पाटणी चौक ते अकोला नाका रस्त्याची दुरवस्था झाली आहे. यामुळे मधला मार्ग म्हणून मंत्री पार्कजवळून वाहने धावत आहेत. हा रस्ता जनता बँकेजवळ निघतो. तो रस्ता अरुंद असून दुतर्फा घरे असल्याने लहान मुलांचा जीव धोक्यात सापडला आहे.
०००
ज्येष्ठांच्या रक्षणासाठी पोलिसांची मोहीम
वाशिम : मुले परगावी स्थायिक झाली असताना घरी एकाकी जीवन जगणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या रक्षणासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या पुढाकारातून विशेष मोहीम राबविली जात आहे. अधूनमधून पोलिसांची चमू ज्येष्ठ नागरिकांच्या घरी जाऊन त्यांची आस्थेने विचारपूस करीत आहे.
00000000000000000000
000000000000000000
प्लास्टिकबंदीच्या अंमलबजावणीचे आवाहन
वाशिम : शहरी भागामध्ये बंदी घातलेल्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर होऊ नये, यादृष्टीने कार्यवाही करावी. नियमाची अंमलबजावणी करून प्लास्टिक पिशवीची विक्री अथवा वाहतूक होत असल्यास दंडात्मक कारवाई करावी, अशा सूचना प्रशासनाने मुख्याधिकाऱ्यांना दिल्या.
000000000000000000000
वळणमार्गाअभावी वाहतूक विस्कळीत
वाशिम : राष्ट्रीय महामार्ग छेदून गेलेल्या वाशिममध्ये अकोला नाका, पुसद नाका, हिंगोली नाका या मुख्य चौकांमधूनच जड वाहने धावत आहेत. वळणमार्ग अद्याप निर्माण झाला नसल्याने ही समस्या उद्भवली असून वाहतूक वारंवार विस्कळीत होत आहे.
00000000000000000
जिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर दुकाने
वाशिम : स्थानिक जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराला लागूनच किरकोळ साहित्य विक्रीची दुकाने थाटण्यात आली आहेत. खाली बसून उघड्यावर साहित्य विक्री करण्याच्या या प्रकारामुळे रुग्णवाहिका ने-आण करताना अडथळा जाणवत आहे.
0000000000000000000000
खड्डे दुरुस्ती, चालकांना दिलासा (फोटो)
वाशिम : वाशिम शहरातील रिसोड नाका, लाखाळा या रस्त्यावरील खड्डे बुजवून रस्ते दुरुस्ती करण्यात आल्याने वाहनचालकांची गैरसोय टळली आहे. यापूर्वी खड्ड्यांमुळे वाहनचालकांची गैरसोय होत होती. याप्रमाणेच सिव्हिल लाईन मार्ग रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.
००००००००००००
प्राचीन तलावाची स्वच्छता
वाशिम : कारंजा लाड नगरपालिका प्रशासनाकडून माझी वसुंधरा अभियानांतर्गत शहरातील प्राचीन आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या बेंबळपाट तलावातील गाळ, कचऱ्याचा उपसा करून या तलावाची स्वच्छता करण्यात आली.
00000000000000000
घरकुल लाभार्थींना निधीची प्रतीक्षा
वाशिम : मानोरा पं.स.अंतर्गत येत असलेल्या ग्रा.पं. तळप बु. येथील अनुसूचित जातीमधील काही लाभार्थींना रमाई घरकुल योजनेंतर्गत घरकुल मंजूर करण्यात आले. परंतु वर्ष उलटले तरी या लाभार्थींच्या खात्यात घरकुल अनुदानाचा निधी जमा करण्यात आला नाही.
00000000000000000000
शिक्षकांच्या वेतनास विलंब
वाशिम : विनाअनुदानित शिक्षकांच्या वेतन अनुदानाचा प्रश्न अद्याप मिटला नाही. जिल्ह्यातील विनाअनुदानित शाळातील बहुतांश शिक्षकांना वेतन मिळण्यास विलंब होत आहे.
0000000000000000