वाशिममध्ये पाच जण पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:28 AM2021-06-24T04:28:15+5:302021-06-24T04:28:15+5:30
................. स्वच्छतेकडे लक्ष पुरविण्याची मागणी वाशिम : स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयातील स्वच्छतागृहाची साफसफाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. पुरेशा ...
.................
स्वच्छतेकडे लक्ष पुरविण्याची मागणी
वाशिम : स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयातील स्वच्छतागृहाची साफसफाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. पुरेशा प्रमाणात पाणी नसल्याने ही समस्या सध्या बिकट झाली आहे.
..................
मानोरा, रिसोडमध्ये प्रत्येकी एक जण बाधित
वाशिम : जिल्ह्यातील मानोरा व रिसोड तालुक्यात बुधवारी नव्याने कोरोना संसर्गाने बाधित प्रत्येकी केवळ एक रुग्ण निष्पन्न झाला. यावरून दोन्ही तालुक्यातून संसर्गाचे संकट निवळत चालल्याचे आशादायक चित्र निर्माण झाले आहे.
..............
प्रवाशांनी ‘मास्क’ वापरण्याचे आवाहन
वाशिम : एस.टी.ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी खबरदारी म्हणून तोंडाला ‘मास्क’चा वापर करावा. यासह एस.टी. त चढताना व उतरताना ‘फिजिकल डिस्टन्सिंग’ पाळावी, असे आवाहन आगारप्रमुख विनोद इलामे यांनी केले आहे.
..............
वाहतूक विस्कळीत; नागरिक त्रस्त
वाशिम : पाटणी चौक व रिसोड नाका येथे विशेषत: सकाळच्या सुमारास वाहतूक विस्कळीत होत आहे. यामुळे विशेषत: पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.
.................
कारंजात रुग्णवाढीचा आलेख मंदावला
वाशिम : जिल्ह्यातील कारंजा तालुक्यात कोरोना रुग्णवाढीचा आलेख पूर्णत: मंदावला आहे. यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला असून, बुधवारी तालुक्यात एकही नवा रुग्ण निष्पन्न झालेला नाही.
..................
पांदण रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी
वाशिम : रिसोड तालुक्यातील मोरगव्हाणवाडी येथील पांदण रस्त्याची दुरवस्था झाली असून, रस्त्यावर ठिकठिकाणी १० ते १५ मीटर अंतराचे खड्डे पडले आहेत. रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
.................
सर्दी, खोकल्याच्या रुग्णांची तपासणी
वाशिम : सर्दी, खोकला, ताप आदी आजार असलेल्या रुग्णांवर वेळीच उपचार व्हावेत, म्हणून वाशिम तालुका आरोग्य विभागाने मोहीम सुरू केली आहे. या अंतर्गत ग्रामीण भागात बुधवारी रुग्णांची तपासणी करण्यात आली.
..................
आययूडीपी काॅलनीतील पथदिवे झाले सुरू
वाशिम : शहरातील आययूडीपी काॅलनी परिसरात मध्यंतरी सर्वच पथदिवे बंद पडले होते. यामुळे रात्रीच्या सुमारास गैरसोय होत होती. संबंधित नगरसेवकांनी लक्ष पुरवून पथदिवे सुरू करून घेतल्याने नागरिकांना दिलासा मिळाला.
.............
गुटखा विक्रेत्यांचे धाबे दणाणले
वाशिम : शासनाने गुटखापुडी विक्रीवर सक्तीने बंदी लादलेली आहे. असे असताना पानटपऱ्या व किराणा दुकानांमधून विक्री सुरूच आहे. पोलिसांनी हे प्रकरण आता गांभीर्याने घेतले असून, कारवाई सुरू केल्याने गुटखा विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे.
..............
महावितरणची धडक मोहीम
वाशिम : कोरोनाकाळात शिथिलता दिल्यानंतर काही दिवसांपासून महावितरणने वीजबिल वसुलीची धडक मोहीम हाती घेतली आहे. या अंतर्गत देयक अदा न करणाऱ्या अनेकांचा वीजपुरवठा खंडित केला जात आहे.
.....................
आरोग्यविषयक विविध प्रश्न प्रलंबित
वाशिम : जिल्ह्यात आरोग्यविषयक विविध प्रश्न प्रलंबित आहेत. ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आवश्यक सुविधा नसल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. अनेक रुग्णांना अकोला ‘रेफर’ केले जात आहे.
................
वाढीव दर कमी करण्याची मागणी
वाशिम : गेल्या काही दिवसांपासून खाद्यतेलासह अन्य स्वरूपातील किराणा साहित्याचे दर वाढले आहेत. यामुळे गृहिणींचे मासिक बजेट बिघडले असून, दर कमी करण्याची मागणी होत आहे.