वाकळवाडीत आठ वर्गांसाठी पाच शिक्षक!

By admin | Published: July 15, 2017 01:56 AM2017-07-15T01:56:02+5:302017-07-15T01:56:02+5:30

विद्यार्थ्यांना बसावे लागते एकाच खोलीत : काही विद्यार्थी बसतात शाळेच्या व्हरांड्यात

Five teachers for eight classes in Golwalkwadi! | वाकळवाडीत आठ वर्गांसाठी पाच शिक्षक!

वाकळवाडीत आठ वर्गांसाठी पाच शिक्षक!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव : तालुक्यातील वाकडवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आठ वर्गांसाठी पाच शिक्षक असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
मेडशीपासून दोन किमी अंतरावरील वाकळवाडी येथे जिल्हा परिषदेची इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतची शाळा आहे. येथे सध्या सहा शिक्षक आहेत. त्यापैकी एक शिक्षिका माधुरी वाकोडे यांची आंतरजिल्हा बदली परभणी जिल्ह्यात झाली आहे. या शाळेत एकूण १२९ विद्यार्थी आहेत. या शाळेत आठ वर्गांसाठी केवळ चार वर्गखोल्या आहेत. त्यामुळे तीन वर्ग व्हरांड्यामध्ये तर काही वर्गखोलीत दोन वर्गातील विद्यार्थी एकत्र बसविले जातात. याकडे वरिष्ठांनी लक्ष देणे गरजेचे आहे.
शाळेत शिक्षकांची पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शिक्षकांची पदे भरण्याची मागणी होत आहे. याकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलनाचा इशारा पालकांनी दिला आहे.

या शाळेत आवश्यक तीन शिक्षक व चार वर्गखोल्या उपलब्ध करुन देण्याची मागणी शिक्षणाधिकारी यांच्याकडे केली आहे . शिक्षणाधिकारी यांनी वर्गखोल्यांबाबत जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे कार्यकारी कार्यकारी यांच्याकडे प्रस्ताव पाठविला आहे.
- एन.एम. ताले, मुख्याध्यापक

Web Title: Five teachers for eight classes in Golwalkwadi!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.