दुसऱ्या दिवशीही पाच अनधिकृत धार्मिक स्थळे हटविली !

By admin | Published: July 7, 2017 01:22 AM2017-07-07T01:22:27+5:302017-07-07T01:22:27+5:30

मंगरूळपीर येथील प्रकार : चोख पोलीस बंदोबस्त

Five unauthorized religious places have been removed in the next day! | दुसऱ्या दिवशीही पाच अनधिकृत धार्मिक स्थळे हटविली !

दुसऱ्या दिवशीही पाच अनधिकृत धार्मिक स्थळे हटविली !

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मंगरुळपीर : शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याची कार्यवाही सलग दुसऱ्या दिवशीही प्रशासनाने केली. ६ जुलै रोजी पाच ठिकाणची स्थळे हटविण्यात आली आहेत.
शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळांवर कार्यवाही करण्याकरिता ५ जुलैपासून प्रारंभ करण्यात आला होता. ५ जुलै रोजी पाच ठिकाणी तर ६ जुलै रोजीसुद्धा पाच अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याची कार्यवाही करण्यात आली. यामध्ये वार्ड क्रमांक १५ मधील साईबाबा मंदिर तसेच वार्ड क्रमांक २ मधील कासीम साहाब सवारी स्थळ चाँद साहेब व करीम साहेब सवारी स्थळ व अन्य दोन सवारी स्थळांचा समावेश आहे, तसेच दोन ठिकाणी स्थगनादेश असल्याची माहिती आहे. एका ठिकाणचे प्रकरण समितीकडे तर एक प्रकरण प्रलंबित असल्याचे समजते. त्यामुळे तेथे धार्मिक स्थळ हटविण्याची कार्यवाही करण्यात आली नाही. कुठेही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलीस विभागाने चोख बंदोबस्त ठेवला होता. शहरातील नागरिकांनीदेखील सहकार्य करावे, असे आवाहन नगर परिषद प्रशासनाने केले होते. या आवाहनाला शहरातील नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.
अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याच्या मोहिमेदरम्यान प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी व पोलिसांची उपस्थिती होती.

Web Title: Five unauthorized religious places have been removed in the next day!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.