निराधारांच्या आधार, खाते क्रमांकात दुरुस्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 06:41 PM2018-05-26T18:41:42+5:302018-05-26T18:41:42+5:30
वाशिम : राष्ट्रीय सामाजिक सहायता कार्यक्रम (एनएसएपी) अंतर्गत केंद्र पुरस्कृत योजनांच्या लाभार्थींचे आधार, खाते क्रमांकांची दुरुस्ती निराधार योजना विभागाच्यावतीने करण्यात येत आहे.
वाशिम : राष्ट्रीय सामाजिक सहायता कार्यक्रम (एनएसएपी) अंतर्गत केंद्र पुरस्कृत योजनांच्या लाभार्थींचे आधार, खाते क्रमांकांची दुरुस्ती निराधार योजना विभागाच्यावतीने करण्यात येत आहे.
केंद्र पुरुस्कृत योजनांच्या लाभार्थींचे अनुदान थेट शासनाकडून त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया दोन महिन्यांपासून अंमलात आली आहे. यासाठी सर्वच लाभार्थींचे आधार क्रमांक आणि खाते क्रमांकासह इतर संपूर्ण माहिती शासनाकडून मागविण्यात आली आहे. तथापि, वाशिम जिल्ह्यातून एनएसएपी पोर्टलवर टाकण्यात आलेल्या १३ हजार ५८६ लाभाथीर्चे खाते क्रमांक आणि आधार क्रमांक जुळत नसल्याचे पडताळणीत दिसून आले आहे. त्यामुळे या लाभार्थींची एनएसपी पोर्टलवर नोंद होऊ शकलेली नाही.
वाशिम जिल्ह्यात केंद्र सरकार पुरस्कृत योजनंतर्गत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धाप पकाळ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विकलांग योजना, तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजनेचे मिळून १९१९७ लाभार्थी आहेत. सर्व लाभार्थींकडून त्यांचे आधार क्रमांक, वयाचा दाखला, अंपंगत्वाचे आॅनलाइन प्रमाण पत्र, तसेच तलाठ्याच्या दाखल्यासह इतर आवश्यक कागदपत्रांची माहिती घेण्यात आली आणि एकूण १५४७७ लाभार्थ्यांची माहिती एनएसएपी पोर्टलवर जिल्हा प्रशासनाच्यावतीने टाकण्यात आली. त्यापैकी केवळ १८९१ लाभार्थ्यांची माहिती जुळत असल्याने तेवढ्याच लाभार्थ्यांची नोंदणी पोर्टलवर झाली असून, उर्वरित १३ हजार ५८६ लाभाथीर्चे प्रस्ताव मात्र फेटाळण्यात आले आहेत. त्यामुळे फेटाळण्यात आलेल्या १३५८६ लाभार्थ्यांसह इतर ३७२० लाभार्थी मिळून एकूण १७३०६ लाभार्थींची अचूक माहिती पुन्हा प्रशासनाला संकलित करून ती एनएसएपी पोर्टलवर टाकण्यासाठी निराधारांचे आधार क्रमांक आणि खाते क्रमांक टाकण्याबाबत झालेल्या चुकांची दुरुस्ती करून ही माहिती नव्याने तयार करण्यात येत आहे.