नाल्याच्या पुराने शेतजमिन खरडली; २०० शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 03:25 PM2018-06-23T15:25:36+5:302018-06-23T15:29:51+5:30
मालेगाव : तालुक्यातील शेलगाव बोंदाडे येथे २३ जूनच्या सकाळी झालेला जोरदार पाऊस आणि यामुळे नाल्याला आलेल्या पुराचे पाणी शेतात घुसल्याने जमिनी खरडून गेल्या. परिणामी, सुमारे २०० शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

मालेगाव तालुक्यातील करंजी महसूल मंडळांतर्गत समाविष्ट शेलगाव बोंदाडे येथे २२ जूनच्या मध्यरात्रीपासून जोरदार पावसाला सुरूवात झाली. २३ जूनलाही पाऊस सुरूच होता. यामुळे गावाशेजारी असलेल्या नाल्याला मोठा पूर येऊन त्याचे पाणी शेतात घुसल्याने अंकुरलेले पीक वाहून जाण्यासोबतच जमिनीही मोठ्या प्रमाणात खरडल्या गेल्या. यामुळे संबंधित शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे.
मालेगाव तालुक्यातील शेलगाव बोंदाडे येथे तुलनेने अधिक पावसाची (५८ मिलीमिटर) नोंद झाली असून यामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी प्रशासनाकडून केली जात आहे. यासंदर्भातील सर्वेक्षण बिनचूक केले जाईल.
- राजेश वजिरे, तहसीलदार, मालेगाव.