अर्धवट अवस्थेतील रस्ता कामांमुळे पूरपरिस्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:28 AM2021-06-18T04:28:45+5:302021-06-18T04:28:45+5:30
मागीलवर्षीदेखील असाच प्रकार घडला होता. तेव्हा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे सहायक अभियंता चौधरी, कनिष्ठ अभियंता हजारे, कंत्राटदार कंपनीचा व्यवस्थापक कणोजे ...
मागीलवर्षीदेखील असाच प्रकार घडला होता. तेव्हा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे सहायक अभियंता चौधरी, कनिष्ठ अभियंता हजारे, कंत्राटदार कंपनीचा व्यवस्थापक कणोजे आदींनी किनखेडा, लिंगा शिवारात भेट दिली होती. यावेळी प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतातून पावसाचे पाणी काढून देण्यासाठी सिमेंट पाईप टाकून दिले जातील, अशी ग्वाही देण्यात आली. मात्र, संबंधित कंपनीने केवळ ३ ते ४ ठिकाणीच लहान आकाराचे पाईप टाकले. परिणामी, यंदा पुन्हा ही समस्या उद्भवली असून शेतकरी पुरते वैतागले आहेत.
...................
राष्ट्रीय महामार्गाचे काम करणाऱ्या कंत्राटदार कंपनीचा व्यवस्थापक समाधानकारक उत्तरे देत नाही. गतवर्षीपासून नाल्यांवर पाईप टाकून देण्याची मागणी शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे केली. मात्र, त्यास कुठलाच प्रतिसाद देण्यात आला नाही. येत्या सात दिवसांत हा प्रश्न निकाली न निघाल्यास संबंधित यंत्रणेच्या कार्यालयासमोर आंदोलन करू.
शोभा अवचार
उपसरपंच, किनखेडा