सणासुदीत फुलांचे भाव तिप्पट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2019 06:12 PM2019-09-07T18:12:11+5:302019-09-07T18:12:17+5:30

रिसोड शहरासह तालुक्यात विविध प्रकारच्या फुलांचे भाव तिप्पट ते चौपट वाढले आहेत.

Flower prices triple at festive occasions! | सणासुदीत फुलांचे भाव तिप्पट !

सणासुदीत फुलांचे भाव तिप्पट !

googlenewsNext


लोकमत न्यूज नेटवर्क
रिसोड  (वाशिम) : ऐन सणासुदीच्या काळात रिसोड शहरासह तालुक्यात विविध प्रकारच्या फुलांचे भाव तिप्पट ते चौपट वाढले आहेत. यामुळे भाविकांसह सर्वसामान्य नागरिकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.
शुक्रवारी बाजारात फुलाचे भाव वाढल्यामुळे गौरी पूजेला लागणाºया हाराची किंमत दुप्पट, तिप्पट झाली होती. सध्या बाजारात फुलांचा तुटवडा असून ज्या फुलांचे भाव मागील वर्षी १०० रुपये किलो होते, ती फुले यावर्षी ३०० रुपये किलो विकत घ्यावे लागत आहेत. त्यामुळे फुलांचे भाव वाढल्याचे फुल विक्रेते मनोहर जहीरव यांनी सांगितले. गौरी गणपती सण एकाच वेळी आल्याने शुक्रवार रिसोड येथील बाजारात फुलाचा तुटवडा जाणवला. शहरातील तसेच ग्रामीण भागातील भाविकांनी फुल तसेच फुलांचे हार खरेदी करण्यासाठी बाजारात एकच गर्दी केली होती. शनिवारीदेखील फुल खरेदीसाठी भाविकांची गर्दी दिसून आली. अनेकांनी झेंडूचे फुले घेऊन घरीच हार तयार करण्यात पसंती दिली. मागील वर्षी हाराच्या किंमती दीडशे रुपये जोडी अशा होत्या. यावर्षी तीनशे रुपये जोडी किंमतीने हार विक्री झाली. गतवर्षी ३०० रुपये हाराची किंमत असलेला हार यावर्षी ७५१ रुपयाला विक्री करण्यात आले. मागील वर्षी झेंडूचे भाव ३० ते ४० रुपये किला असे होते. यावर्षी तेच भाव शंभर रुपये किलो होते. शेवंती शंभर रुपयावरून यावर्षी ३०० रुपये किलो, निशिगंधा २०० रुपयावरून ४०० रुपये अशा फुलांच्या किंमती वाढल्या. फुुल विक्रेते जहिरव म्हणाले की, हैद्राबाद, अहमदनगर, नांदेड येथून फुले आणावी  लागतात. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने फुलांचे दर वाढले आहेत. त्यामुळे वाढत्या दरानुसार ग्राहकांना फुलांची विक्री करावी लागते.

Web Title: Flower prices triple at festive occasions!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.