दसरा, दिवाळीपुर्वीच गडगडले झेंडूचे दर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2019 02:15 PM2019-10-06T14:15:45+5:302019-10-06T14:16:24+5:30

किलोभर झेंडू फुलांना अवघा १५ ते २० रुपये दर मिळत आहे.

Flowers rates slashed even before Diwali! | दसरा, दिवाळीपुर्वीच गडगडले झेंडूचे दर!

दसरा, दिवाळीपुर्वीच गडगडले झेंडूचे दर!

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : महिनाभरापूर्वी गौरी स्थापनेच्या कालावधीत २० ते २५ झेंडूच्या फुलांची माळा २५० ते ३०० रुपयांना विकल्या गेली. सद्या मात्र त्याच झेंडूचे दर पुरते गडगडले असून किलोभर झेंडू फुलांना अवघा १५ ते २० रुपये दर मिळत आहे. दसरा, दिवाळीपुर्वीच दर गडगडल्याने जिल्ह्यातील झेंडू फुल उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
नवरात्र, दसरा आणि दिवाळीच्या काळात झेंडूच्या फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. त्यानुसार, जिल्ह्यातील बाजारपेठेत या फुलांची आवक वाढली आहे. असे असताना फुलांचे दर अगदीच कमी झाल्याने फुल उत्पादक शेतकऱ्यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.
वाहतूक खर्चही वसूल होणे कठीण
यावर्षी जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकांऐवजी झेंडूची लागवड केली. अनुकूल वातावरणामुळे शेकडो एकर परिसरात सद्य:स्थितीत झेंडू फुलांचे विक्रमी उत्पादन झाले आहे. दुसरीकडे मात्र दसरा, दिवाळीपुर्वीच झेंडूच्या दराने निच्चांकी पातळी गाठली असून लागवड व वाहतूक खर्चही वसूल होणे कठीण झाल्याचे काही शेतकºयांचे म्हणणे आहे.

Web Title: Flowers rates slashed even before Diwali!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.