कोरोना रुग्णसंख्येत चढ-उतार; रेमेडीसिवर इंजेक्शनचा वापरही घटला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 11:52 AM2020-12-16T11:52:38+5:302020-12-16T11:53:49+5:30

Remedesivir injection News जिल्ह्यात रेमेडीसिवर इंजेक्शन मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.

Fluctuations in corona morbidity; Remedesivir injection use also decreased! | कोरोना रुग्णसंख्येत चढ-उतार; रेमेडीसिवर इंजेक्शनचा वापरही घटला!

कोरोना रुग्णसंख्येत चढ-उतार; रेमेडीसिवर इंजेक्शनचा वापरही घटला!

Next
ठळक मुद्देप्रत्यक्ष रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या कमालीची घटली आहे. दिवसाकाठी सरासरी १५ ते २० रेमेडीसिवर इंजेक्शनचा वापर होत आहे.

 लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यात अलीकडच्या काळात कोरोना रूग्णांच्या संख्येत चढ-उतार असून, पूर्वीच्या तुलनेत सध्या रेमेडीसिवर इंजेक्शनचा वापर प्रचंड प्रमाणात घटला आहे. जवळपास ८० टक्के रुग्ण हे गृहविलगीकरणात असून, जिल्ह्यात रेमेडीसिवर इंजेक्शन मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.
जिल्ह्यात ३ एप्रिल रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होता. मे महिन्यापर्यंत जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात होती. त्यानंतर हळूहळू रुग्णसंख्येत वाढ होत गेली. सप्टेंबर महिन्यात कोरोनाचा उद्रेक झाला. त्यानंतर कोरोनाचा आलेख खाली आला. नोव्हेंबर महिन्यात यामध्ये आणखी घट आली. डिसेंबर महिन्यात रुग्णसंख्येत चढ-उतार दिसून येत आहे. कोरोनाची साैम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांना गृहविलगीकरणाचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला. त्यामुळे प्रत्यक्ष रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या कमालीची घटली आहे. सध्या जवळपास १५ ते २० रुग्ण हे सरकारी दवाखान्यात उपचार घेत आहेत, तर उर्वरित रुग्णांनी गृहविलगीकरणाचा पर्याय स्वीकारला आहे. दिवसाकाठी सरासरी १५ ते २० रेमेडीसिवर इंजेक्शनचा वापर होत असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले. सध्या जिल्ह्यात मुबलक प्रमाणात रेमेडीसिवर इंजेक्शन उपलब्ध आहे.

जिल्ह्यात सध्या कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात आहे. साैम्य लक्षणे असणारे रुग्ण गृह विलगीकरणात आहेत. सरकारी रुग्णालयांमध्ये जवळपास १५ ते २० रुग्ण उपचारार्थ आहेत. रेमडेसिवर इंजेक्शनसह आवश्यक त्या औषधीचा साठा जिल्ह्यात मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे.
- डाॅ. मधुकर राठोड, 
जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय

Web Title: Fluctuations in corona morbidity; Remedesivir injection use also decreased!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.