सोने, चांदीच्या दरात चढ-उतार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:01 PM2021-02-16T16:01:05+5:302021-02-16T16:01:21+5:30
Gold and Silver prices १६ फेब्रुवारी रोजी सोने प्रति तोळा ४७ हजार ७०० रुपये तर चांदी प्रति किलो ७० हजार ५०० रुपये असे दर होते.
वाशिम : गत काही दिवसांत सोने, चांदीच्या दरात चढ-उतार दिसून येत असून, मागील पाच दिवसांत सोन्याचे प्रती तोळा दर हे ४८ हजार ३०० वरून ४७ हजार ७०० रुपयापर्यंत खाली आले तर चांदीचे प्रती किलो दर ६९ हजारावरून ७० हजार ५०० हजारापर्यंत झेपावले.
‘कोरोना’मुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर झालेला परिणाम, डॉलरचे घसरणारे मुल्य, शेअर बाजारातील अस्थिरता यामुळे सुरूवातीच्या काळात गुंतवणूकदार हे सुरक्षित व खात्रीलायक गुंतवणूक म्हणून सोने, चांदी खरेदीकडे वळले होते. त्यामुळे सोने, चांदीच्या दरात वाढ होत गेली. कोरोना काळात गुंतवणुकीचा चांगला आणि खात्रीलायक पर्याय म्हणून गुंतवणुकदार हे सोने, चांदीमध्ये गुंंतवणूक करीत असल्याने मध्यंतरी सराफा बाजारात चांगलीच तेजी आली होती. अनलॉकच्या टप्प्यात बाजारपेठ पूर्ववत झाली असून, उलाढालही वाढत आहे. त्यामुळे गुंतवणूक म्हणून अन्य क्षेत्रालाही प्राधान्य दिले जात असल्याचे दिसून येते. गत काही दिवसांपासून सोने, चांदीच्या दरात चढ-उतार दिसून येत आहे. कधी सोने, चांदीला झळाळी मिळते तर कधी दरात घसरण होते. गत पाच दिवसांतील बाजारभाव विचारात घेतले तर सोने प्रति तोळा ७०० रुपयाने स्वस्त झाले तर चांदी प्रती किलो १५०० रुपयाने महागल्याचे दिसून येते. ११ फेब्रुवारी रोजी सोने प्रति तोळा ४८ हजार ३०० रुपये तर चांदी प्रति किलो ६९ हजार रुपये असे दर होते. १६ फेब्रुवारी रोजी सोने प्रति तोळा ४७ हजार ७०० रुपये तर चांदी प्रति किलो ७० हजार ५०० रुपये असे दर होते.
असे आहेत दर
सोने (प्रती तोळा) चांदी (प्रती किलो)
११ फेब्रुवारी रोजीचे दर सोने ४८,३०० चांदी ६९,०००
१६ फेब्रुवारी रोजीचे दर सोने ४७,७०० चांदी ७०,५००