सोन्याच्या दरात चढ-उतार; ‘बाजारभावा’चा अंदाज येईना

By संतोष वानखडे | Published: May 15, 2024 04:04 PM2024-05-15T16:04:36+5:302024-05-15T16:04:46+5:30

गुंतवणुकीच्या सुरक्षित व खात्रीशीर पर्याय, लग्न सराई, सोने-चांदीचे विशेष आकर्षण म्हणून अनेकजण सोने-चांदीच्या खरेदीकडे वळतात.

Fluctuations in the price of gold; The market price cannot be predicted | सोन्याच्या दरात चढ-उतार; ‘बाजारभावा’चा अंदाज येईना

सोन्याच्या दरात चढ-उतार; ‘बाजारभावा’चा अंदाज येईना

वाशिम : मे महिन्यात सोने-चांदीच्या दरात चढ-उतार असून, बाजारभावाचा ‘करेक्ट’ अंदाज येत नसल्याची परिस्थिती आहे. ७ मे रोजी सोन्याचे प्रती तोळा दर ७० हजार ९०० रुपयापर्यंत खाली घसरले होते तर १५ मे रोजी प्रती तोळा भाव ७२ हजार रुपये होते.

गुंतवणुकीच्या सुरक्षित व खात्रीशीर पर्याय, लग्न सराई, सोने-चांदीचे विशेष आकर्षण म्हणून अनेकजण सोने-चांदीच्या खरेदीकडे वळतात. गत काही महिन्यांत सोने आणि चांदीच्या दरांमध्ये सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहे. मार्च व एप्रिल या दोन महिन्यांत सोन्याच्या दरात प्रचंड तेजी आली होती. मे महिन्यात सोने, चांदीच्या दरात घसरण सुरू झाली.

घसरण कायम राहण्याचा अंदाज असताना, अधूनमधून सोने-चांदीच्या दरात वाढ होत असल्याने बाजारभावाचा ‘करेक्ट’ अंदाज येईना, अशी परिस्थिती आहे. १३ मे रोजी वाशिमच्या सराफा बाजारात २२ कॅरेट सोने प्रती तोळा ७२ हजार २०० रुपये दर होते. १४ मे रोजी यामध्ये ६०० रुपयाने घट होत ७१ हजार ६०० रुपये दर होते. १५ मे रोजी यामध्ये पुन्हा ४०० रुपयाने वाढ झाल्याने प्रती तोळा दर ७२ हजार रुपये होते. यामध्ये जीएसटीचा समावेश नव्हता.

चांदी ८४ हजारावरच...

चांदीच्या भावात फारशी घसरण नसल्याचे दिसून येते. वाशिमच्या सराफा बाजारात २० एप्रिल २०२४ रोजी चांदीला प्रती किलो ८४ हजार रुपये भाव होता. ३० एप्रिल रोजी यामध्ये तीन हजाराने घसरण होत ८१ हजार रुपये भाव होता. ६ व ७ मे रोजी ८२ हजार रुपये प्रती किलो असा भाव मिळाला होता. १३ मे रोजी ८३ हजार ५०० रुपये तर १४ व १५ मे रोजी ८४ हजार रुपये भाव होता.

सोन्याला किती भाव?

महिना / भाव
१ मे - ७०,७००
२ मे  ७१,०००
३ मे - ७०,७००
६ मे - ७१,३००
७ मे - ७०,९००
१३ मे - ७२,२००
१४ मे - ७१,६००
१५ मे - ७२,०००

Web Title: Fluctuations in the price of gold; The market price cannot be predicted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.