रिसोड तालुक्यात चाराटंचाई; पशुपालक त्रस्त !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2019 04:17 PM2019-03-29T16:17:31+5:302019-03-29T16:17:59+5:30
रिसोड : गतवर्षी पडलेल्या अपुºया पावसामुळे रिसोड तालुक्यातील पशुपालकांना यावर्षी चाराटंचाईला सामोरे जावे लागत आहे. चाºयाच्या बाजारभावातही वाढ झाल्याने पशुपालकांच्या खिशाला झळ बसत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
रिसोड : गतवर्षी पडलेल्या अपुºया पावसामुळे रिसोड तालुक्यातील पशुपालकांना यावर्षी चाराटंचाईला सामोरे जावे लागत आहे. चाºयाच्या बाजारभावातही वाढ झाल्याने पशुपालकांच्या खिशाला झळ बसत आहे.
गतवर्षी रिसोड तालुक्यात पावसाने सरासरी गाठली नाही. एकूण सरासरीच्या ८४ टक्के पाऊस पडला. तालुक्यातील प्रकल्पातही सध्या सरासरी पाच टक्के जलसाठा आहे. त्यापैकी १० प्रकल्प तर कोरडेठण्ण आहेत. गतवर्षीच्या खरिप हंगामात शेतकºयांना अपेक्षीत उत्पादन घेता आले नाही. प्रकल्पांत पाणी नसल्याने आणि भूजलपातळीत घट झाल्याने जनावरांसाठी हिरवा चाराही शेतकºयांना घेत आला नाही. जिल्ह्यात केवळ रिसोड तालुक्यात मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहिर झालेला आहे, यावरून तालुक्यातील दुष्काळ परिस्थिती लक्षात येते. मध्यम स्वरुपाचा दुष्काळ असल्याने तालुक्यात चारा छावणी सुरू होणे अपेक्षीत आहे. मात्र, अद्याप चारा छावणी सुरू झालेली नाही. चारा टंचाई असल्याने चाºयाच्या बाजारभावात कमालीची वाढ झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी १५ ते २० टक्क्याने सुका व ओल्या चाºयाच्या दरात वाढ झाल्याने याचा फटका पशुपालकांना बसत आहे. चाराटंचाईच्या पृष्ठभूमीवर चारा छावणी सुरू करावी, अशी मागणी पशुपालकांनी केली आहे.
जिल्ह्यातील चाºयाची परजिल्ह्यात वाहतूक ..
जिल्ह्यात चाराटंचाई असल्याने जिल्ह्यातील चारा परजिल्ह्यात नेण्यावर निर्बंध आहेत. तथापि, याकडे दुर्लक्ष करीत जिल्ह्यातील चारा परजिल्ह्यात नेला जात असल्याचे दिसून येते. रिसोड तालुक्यातील काही ठिकाणांवरून परजिल्ह्यात चाºयाची विक्री होत असल्याचे दिसून येते. परजिल्ह्यातील पशुपालक जादा दर देत असल्याने ही चाराविक्री होत असल्याची चर्चा आहे. तालुक्यातील जनावरांचा चारा परजिल्ह्यात जाऊ नये याकरीता प्रशासनाने वेळीच उपाययोजना करणे गरजेचे ठरत आहे.
पाणीटंचाईची तिव्रता वाढली..
रिसोड तालुक्यात सध्या तिव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याने पशुपालकांच्या समस्येत भर पडली आहे. जनावरांसाठी पिण्याचे पाणी उपलब्ध करताना पशुपालकांच्या नाकीनऊ येत आहे. काही गावांमध्ये माणसांना पिण्याचे पाणी मिळविण्यासाठी कोसोदूर पायपिट करावी लागत असल्याने तेथे जनावरांसाठी पाणी उपलब्ध करताना पशुपालकांची दमछाक होत असल्याचे दिसून येते.