धुके, ढगाळी वातावरणाने तूरपीक संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 06:12 AM2021-01-08T06:12:06+5:302021-01-08T06:12:06+5:30

पोषक हवामानामुळे सुरुवातीला तूरपिकाची स्थिती उत्तम होती. मोठ्या प्रमाणात फुले लदबदल्याने विक्रमी उत्पादन होण्याचे संकेत शेतक-यांनी वर्तविले होते; मात्र ...

In foggy weather with foggy, cloudy weather | धुके, ढगाळी वातावरणाने तूरपीक संकटात

धुके, ढगाळी वातावरणाने तूरपीक संकटात

Next

पोषक हवामानामुळे सुरुवातीला तूरपिकाची स्थिती उत्तम होती. मोठ्या प्रमाणात फुले लदबदल्याने विक्रमी उत्पादन होण्याचे संकेत शेतक-यांनी वर्तविले होते; मात्र मध्यंतरी या पिकावर उद्भवलेला मररोग आणि आता सातत्याने पडत असलेले धुके व कायम असलेल्या ढगाळी वातवरणामुळे तुरीच्या झाडांना केवळ पालाच शिल्लक राहिल्याचे चित्र काही ठिकाणी दिसून येत आहे. ‘अर्ली व्हेरायटी’ असणा-या तुरीपासून काही प्रमाणात उत्पन्न हाती पडले; मात्र उशिरा माल धारण करणा-या तुरीपासून ५० टक्केही उत्पन्न हाती पडणार नाही, अशी स्थिती उद्भवली आहे.

.............................

कोट :

दररोज पडत असलेले धुके व विषम हवामानामुळे तुरीच्या झाडांची शेंडे करपली आहेत. त्यामुळे अर्धीअधिक तूर पूर्णत: नुकसानीच्या विळख्यात सापडली असून उर्वरित झाडांपासूनही फारसे उत्पन्न हाती पडणार नसल्याची स्थिती आहे.

- अभिजित पाटील

शेतकरी, धामणी मानोरा

Web Title: In foggy weather with foggy, cloudy weather

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.