टाकाऊ प्लॅस्टिक बॉटलपासून पक्षांसाठी पाणवठे ; मालेगावच्या जावेदचे असेही पक्षीप्रेम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 02:30 PM2018-04-16T14:30:05+5:302018-04-16T14:30:05+5:30

Foliage for birds with a waste plastic bottle | टाकाऊ प्लॅस्टिक बॉटलपासून पक्षांसाठी पाणवठे ; मालेगावच्या जावेदचे असेही पक्षीप्रेम

टाकाऊ प्लॅस्टिक बॉटलपासून पक्षांसाठी पाणवठे ; मालेगावच्या जावेदचे असेही पक्षीप्रेम

Next
ठळक मुद्देसद्यस्थितीत उन्हाळयाचे दिवस असल्याने पक्ष्यांना पाणी मिळणे टंचाईमुळे खूप कठीणझाले आहे. प्लॅस्टिकच्या रिकाम्या बॉटल कापून त्यापासून पक्ष्यांसाठी पाणवठे तयार करीत आहेत. शेतामध्ये झाडांच्या फांद्यांवर बांधून त्यामध्ये रोज पाणी भरण्याचे कार्य सुध्दा ते करताहेत .

 मालेगाव : टाकाऊ प्लॅस्टिक बॉटलपासून पक्षांसाठी पाणवठे तयार करून ते शेतात लावण्याचं काम मेडशी येथील  जावेद धन्नू भावानीवाले करीत असून त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतूक केल्या जात आहे. नियमित सामाजिक उपक्रम राबवून समाजसेवा करण्याचा जावेद प्रयत्न करतात. गत काही महिन्यांआधी त्यांनी  स्वच्छ भारत अभियान  बाबत जागृती करणारी शॉर्ट टेली फिल्म बनवून लोकांना दाखविली व स्वच्छतेचे महत्वाबाबत जनजागृती केली होती. सोबतच शेतकरी आत्महत्या थांबाव्यात यासाठी सुध्दा त्यांनी शॉर्ट फिल्मव्दारे जनजागृती करुन शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी प्रयत्न करुन शेतकºयांचे मनोबल वाढविण्याचा उपक्रम हाती घेतला होता. तसेच वृक्षलागवड व संवर्धन यांच्यावर त्यांनी जनजागृती केली आहे. सद्यस्थितीत उन्हाळयाचे दिवस असल्याने पक्ष्यांना पाणी मिळणे टंचाईमुळे खूप कठीणझाले आहे. याकरिता त्यांनी पाणी बॉटलसह विविध टाकाऊ वस्तुपासून पक्ष्यांसाठी पाणवठे तयार करुन ते शेतात, गावात लावण्याचे कार्य हाती घेतले आहे.

गत ३ वर्षापासून ते  पाणी बॉटल, कीटकनाशके व पिकांच्या टॉनिक प्लॅस्टिकच्या रिकाम्या बॉटल कापून त्यापासून पक्ष्यांसाठी पाणवठे तयार करीत आहेत . ते शेतामध्ये झाडांच्या फांद्यांवर बांधून त्यामध्ये रोज पाणी भरण्याचे कार्य सुध्दा ते करताहेत .यामुळे वाया जाणाºया बॉटल उपयोगात आणल्या जात आहेत .त्यापासून पाणवठे तयार होत आहेत .जावेद च्या या उपक्रमा पासून युवकांनी प्रेरणा घेण्याची गरज आहे .

 

जावेद भवानीवाले यांनी अतिशय चांगला उपक्रम सुरू आहे .सध्या पक्ष्यांना पाणी मिळत नाही .त्यामुळे पक्ष्यांसाठी पानवठे सुर करण्याची गरज आहे .ती पूर्ण करण्यासाठी एक नविन प्रयत्न जावेद करित आहे . त्यांच्या कार्यामुळे इतरांनाही प्रेरणा मिळत आहे.

- तुकाराम गावंडे, सामाजिक कार्यकर्ते, मालेगाव

Web Title: Foliage for birds with a waste plastic bottle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.