पात्र विधवा महिलांना योजनेचा लाभ देण्यासाठी पाठपुरावा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:26 AM2021-07-09T04:26:23+5:302021-07-09T04:26:23+5:30

वाशिम : कोरोनामुळे पतीचे निधन झाल्यामुळे विधवा झालेल्या पात्र महिलांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळणार आहे. या अनुषंगाने ...

Follow up to give eligible widows the benefit of the scheme | पात्र विधवा महिलांना योजनेचा लाभ देण्यासाठी पाठपुरावा करा

पात्र विधवा महिलांना योजनेचा लाभ देण्यासाठी पाठपुरावा करा

Next

वाशिम : कोरोनामुळे पतीचे निधन झाल्यामुळे विधवा झालेल्या पात्र महिलांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळणार आहे. या अनुषंगाने कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी महिला व बालविकास विभागाने पाठपुरावा करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी ८ जुलै रोजी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात झालेल्या जिल्हास्तरीय कृती दलाच्या बैठकीत ते बोलत होते.

यावेळी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा पुरवठा अधिकारी संदीप महाजन, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, प्रभारी जिल्हा नगरपालिका प्रशासन अधिकारी दीपक मोरे यांच्यासह कृती दलाचे शासकीय व अशासकीय सदस्य उपस्थित होते. जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. म्हणाले, कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या मुलांची संख्या ५ असून या मुलांना शासनाच्या निर्देशानुसार लाभ मिळवून देण्याची कार्यवाही त्वरित करावी. तसेच एक पालक गमावलेल्या बालकांना बालसंगोपन योजनेचा लाभ देण्याची कार्यवाही करावी. कोरोनामुळे विधवा झालेल्या पात्र महिलांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ देण्याबाबत यापूर्वी सूचित करण्यात आले आहे. या महिलांना योजनेचा लाभ देण्यासाठी महिला व बाल विकास विभागाने सर्व तहसीलदारांशी समन्वय साधून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता तातडीने करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या.

००

१७७ बालकांना बालसंगोपन योजनेचा लाभ

जिल्हास्तरीय कृती दलामार्फत आतापर्यंत करण्यात आलेल्या कार्यवाहीची माहिती सुभाष राठोड यांनी दिली. बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) व जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बाल कल्याण) यांच्यामार्फत एक पालक आणि दोन्ही पालक गमावलेल्या बालकांचे सर्वेक्षण करण्यात आले असून अशा १७७ बालकांना बालसंगोपन योजनेचा लाभ देण्यात येत आहे.

Web Title: Follow up to give eligible widows the benefit of the scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.