जिल्हा रुग्णालयातच नियमांकडे पाठ; अशी रोखणार कोरोनाची तिसरी लाट?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:28 AM2021-09-02T05:28:42+5:302021-09-02T05:28:42+5:30
वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी फिजिकल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर आणि हात वारंवार धुणे या त्रिसूत्रीचा वापर करण्याचा ...
वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी फिजिकल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर आणि हात वारंवार धुणे या त्रिसूत्रीचा वापर करण्याचा सल्ला आरोग्य विभागाकडून देण्यात येत असला तरी प्रत्यक्षात सरकारी रुग्णालयांतच या त्रिसूत्रीचे पालन होत नसल्याचे दिसून येते. जिल्हा सामान्य रुग्णालयात ‘ना फिजिकल डिस्टन्सिंग, ना मास्क’ असे चित्र मंगळवार, ३१ ऑगस्ट रोजी दिसून आले. जिल्हा रुग्णालयातच अशी परिस्थिती असल्याने तिसरी लाट कशी रोखणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सध्या कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. मात्र, कोरोनाचा धोका पूर्णत: संपलेला नाही. तिसऱ्या लाटेची शक्यतादेखील तज्ज्ञांकडून वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी बिनधास्त न राहता फिजिकल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर करावा, असा सल्ला आरोग्य विभागाकडून दिला जात आहे. दुसरीकडे सरकारी रुग्णालयांमध्येच या नियमाचे पालन होत नाही. जिल्हा सामान्य रुग्णालयात दैनंदिन ओपीडीत वाढ होत असून, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन झाले नसल्याचे मंगळवारी दिसून आले.
००००००००००००००
फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा! (फोटो)
वाशिम येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात मंगळवारी पाहणी केली असता, बहुतांश कक्षांसमोर रुग्णांची गर्दी दिसून आली. यावेळी रुग्णांमध्ये विशिष्ट अंतर ठेवण्यात आले नाही. तपासणी कक्षातही फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन झाले नसल्याचे दिसून आले.
०००
मास्कच नाही (फोटो३१/
जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी आलेले तसेच रुग्णांसोबत आलेल्या अनेक नातेवाइकांनी मास्कचा वापर केला नसल्याचे दिसून आले. काही जणांच्या हनुवटीलाच मास्क असल्याचे दिसून आले.
००००००
ओपीडी हाऊसफुल्ल
कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागासह अन्य विभागातील तपासणी पूर्ववत झाली आहे.
त्यामुळे दैनंदिन सरासरी ७०० ते ८०० ओपीडी असल्याचे सांगण्यात येते. कोरोनाकाळात दैनंदिन २०० ते ३०० ओपीडी होत्या.
‘व्हायरल फीव्हर’ असल्याने सरकारी रुग्णालयांत मोठ्या संख्येने रुग्ण तपासणीसाठी येत आहेत.
०००००
डेंग्यू, मलेरियाचे रुग्ण वाढताहेत
डेंग्यूसदृश, मलेरियाचे रुग्ण सध्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. याबरोबरच ताप, खोकला, डोकेदुखी अशी लक्षणे असणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही वाढ होत असल्याचे सांगितले जात आहे.
०००००
रुग्णालयेच सुपरस्प्रेडर ठरू नये...
सरकारी रुग्णालयांत फिजिकल डिस्टन्सिंग तसेच मास्कचा वापर करण्याकडे दुर्लक्ष होत असल्याने एखाद्या संदिग्ध रुग्णापासून इतरांना संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. रुग्णालयेच सुपरस्प्रेडर ठरू नये, याची दक्षता घेणे आवश्यक आहे.
०००००
कोट
जिल्हा सामान्य रुग्णालयासह सरकारी रुग्णालयांमध्ये फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन व्हावे, मास्कचा वापर असलेल्या रुग्णालाच तपासणी कक्षात घ्यावे, अशा सूचना सर्वांना दिलेल्या आहेत. रुग्ण व नातेवाइकांनीदेखील फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन आणि मास्कचा वापर करून प्रशासनाला सहकार्य करावे. कोरोना संसर्ग होणार नाही, याची दक्षता सर्वांनी घ्यावी.
- डॉ. मधुकर राठोड
जिल्हा शल्य चिकित्सक, वाशिम