मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतींच्या राजीनाम्यानंतर राजकीय घडामोडींना वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2018 02:17 PM2018-06-09T14:17:14+5:302018-06-09T14:17:14+5:30
मालेगाव : अखेर मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती बबनराव चोपडे यांनी सभापती पदाचा राजीनामा दिल्याने नव्या सभापती उपसभापती निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.
मालेगाव : अखेर मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती बबनराव चोपडे यांनी सभापती पदाचा राजीनामा दिल्याने नव्या सभापती उपसभापती निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. आमदार अमित झनक आणि माजी जि.प.अध्यक्ष दिलीपराव जाधव यांचा निर्णय अंतीम राहणार आहे. सत्ताधारी गटाकडे तेरा संचालक आहेत तर विरोधी गट ही हालचालीवर बारीक लक्ष ठेवुन आहे. राजकीय घडामोडी वाढल्यात मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बबनराव चोपडे यांनी अखेर आपला राजीनामा जिल्हा उपनिबंधक वाशिम यांचेकडे गुरुवारी ८ सादर कल्याने सहकार क्षेत्रातील घडामोडींना वेग आला आहे. सत्ताधारी शेतकरी विकास पॅनलमध्ये सर्वाधिक संचालक रा.काँ.पक्षाचे राजकुमार शिंदे , दिपाली उंडाळ, आशा शेळके, गणपतराव गालट, बबनराव चोपडे असे पाच ंचालक आमदार अमित झनक समर्थक काँग्रेस पक्षाचे डॉ.प्रमोदनवघरे, किसनराव घुगे,सुरेश शिंदे, प्रकाश अंभोरे, असे चार संचालक, शिवसेनाच्यासुनिताताई अंभोरे आहेत. व्यापारीमधून रविकुमार भुतडा, विजयभुतडा आणि हमाल मापारी गटातुन संचालक शंकररराव मगर असे तेरा संचालक आहेत तर माजी खासदार अनंतराव देशमुख समर्थक माजी सभापती गजानन देवळे व आमदार विनायकराव मेटे भाजपा यांच्या पॅनलमधील वनिता अमोल लहाने, प्रदीप पाटील कुटे, प्रयागबाई जोगदंड, नानाराव आदमने, प्रकाश पाटील कुटे असे पाच संचालक आहेत. सत्ताधारी गटाची बांधणी करतांना प्रत्येक संचालकाला सव्वा सव्वा वर्षे सभापती अथवा उपसभापती गटाची संधी देण्याचे ठरले असल्याची चर्चा होती. त्यामुळे सव्वा वर्षाचा कालावधी पूर्ण होताच सभापतींच्या राजीनाम्याबाबतची चर्चा सहकार क्षेत्रात सुरु होती. अखेर गुरुवार ७ रोजी सभापती पदाचा राजीनामा चोपडे यांनी वाशिमला उपनिबंधकाकडे सादर केला आहे. त्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. माजी खासदार अनंतराव देशमुख काही खेळी खेळतात, काय, शिवसंग्रमाचे अध्यक्ष आमदार विनायकराव मेटे यांच्या भेटींशी त्यांचे समर्थक संचालक जाणार आहेत तसेच माजी आमदार अॅड.विजयराव जाधव यांनी ही लक्ष वेधल्याचे समजते. तुर्तास सर्व संचालक आमदार अमित झनक यांनी दिलीपराव जाधव यांचेवर निणृय सोपविल्याचे सांगताहेत. प्रत्यक्षात मात्र विधानसभा सारखे नेतृत्व काँग्रेस पक्षाकडे असल्याने स्थानिक स्वराज्य संस्था बाजार समिती, नगर पंचायतमित्र पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात ठेवण्यात असाही सुर निघत आहे.