१७ दिवसांपासून दररोज १७५ कर्मचारी, निराधारांना भोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 03:31 PM2020-04-11T15:31:27+5:302020-04-11T15:31:33+5:30
१७५ जणांना दररोज दोन वेळीचे भोजन देण्याचा उपक्रम समाजसेवक राजु पाटील राजे यांनी गत १७ दिवसांपासून सुरु केला आहे.
-नंदकिशोर नारे
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : कोरोना संसर्गाचा फैलाव होऊ नये याकरिता कर्तव्य बजावणाºया पोलीसासह इतर ९० कर्मचारी व निराधार, गोरगरिब कुटुंबातील ८५ असे एकूण १७५ जणांना दररोज दोन वेळीचे भोजन देण्याचा उपक्रम समाजसेवक राजु पाटील राजे यांनी गत १७ दिवसांपासून सुरु केला आहे. याकरिता त्यांना दररोज प्रतिदिन १३ हजार रुपये खर्च येत आहे.
कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमिवर जिल्हयात १७ दिवसाआधी संचारबंदी जाहीर करण्यात आली. या संचारबंदीत रात्रंदिवस झटत असलेले पोलीस कर्मचारी, आरोग्य विभागातील कर्मचारी यांच्या जेवणाचे हाल होऊ नये याकरिता राजु पाटील राजे यांनी कर्मचाºयांना भोजन देण्याचा उपक्रम होती घेतला. दरम्यान अनेक निराधार, गोरगरिब कुटुंबांनाही दोनवेळचे जेवण सुरु केले. कर्तव्यावर असलेल्या कर्मचाºयांसाठी पॅकींगफूड जे १०० रुपये थालीप्रमाणे तर निराधारांकरिता देण्यात येत असलेले थाली ५० रुपये प्रमाणे असे एकूण १७५ जणांना जेवणासाठी प्रतिदिन १३ हजार रुपयांच्या जवळपास खर्च येत आहे. सामाजिक दायित्व स्विकारलेल्या राजे यांनी आपला एका चांगल्या कार्यास हातभार लागत आहे यापेक्षा पुण्याचे काम नसल्याच्या प्रतिक्रीया व्यक्त करुन याकरिता माझे मित्र बालाजी ढवळे, यांच्या नेतृत्वात संतोष शिंदे, कपील सारडा, गजानन कटके, धनंजय रणखांब, आनंद गडेकर, शंकर शिंदे सहकार्य करीत आहेत त्यांचे मोलाचे योगदान आहे. सदर उपक्रम संचारबंदी उठेपर्यंत सुरु ठेवण्यात येणार असल्याचा मानस राजु पाटील राजे यांनी व्यक्त केला.
कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमिवर सर्वच जण घरी राहून आपल्या कुटुंबियांची काळजी घेत असतानाच राजु पाटील राजे यांनी कर्तव्यावर असलेल्या कर्मचाºयांना व निराधारांना दोन वेळीचे पोटभर जेवण व प्रत्येक चौकात असलेल्या पोलिसांना पाण्याची कॅन देण्याचा निर्णय घेतला.