कामरगाव जिल्हा परिषद विद्यालयातील खाद्य महोत्सवात रानभाज्यांची रेलचेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 03:27 PM2018-01-06T15:27:33+5:302018-01-06T15:30:28+5:30
कारंजा: कामरगाव येथील जिल्हा परिषद विद्यालयात आयोजित खाद्यमहोत्सवात विद्यार्थ्यांनी आनंद मेळावा साजरा केला या आनंद मेळाव्यात विविध खाद्यपदार्थांसोबतच विविध प्रकारच्या रानभाज्यांपासून बनवलेले पदार्थही विशेष आकर्षण ठरले.
कारंजा: कामरगाव येथील जिल्हा परिषद विद्यालयात आयोजित खाद्यमहोत्सवात विद्यार्थ्यांनी आनंद मेळावा साजरा केला.या आनंद मेळाव्यात विविध खाद्यपदार्थांसोबतच विविध प्रकारच्या रानभाज्यांपासून बनवलेले पदार्थही विशेष आकर्षण ठरले.विद्यार्थ्यांनी या रानभाज्यांचा आस्वाद घेतला .
दरवर्षी प्रमाणे यावर्षी जिल्हा परिषद विदयालय कामरगाव येथे आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होत.े या आनंद मेळाव्याचे उदघाटन शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा देशमुख यांनी केले. संवेदना संस्था व पर्यावरण शिक्षण केंद्र पुणे यांचे पर्यावरण शिक्षण मित्र साहेबराव राठोड , भिमराव सुरडकर, पर्यवेक्षिका प्रेमलता पारवे, गोपाल खाडे उपस्थित होते. रानभाजी खाद्यमहोत्सवाच्या आयोजन निता तोडकर पर्यावरण शिक्षक यांनी मुख्याध्यापिका सुरेखा देशमुखा यांच्या मार्गदर्शनात केले होते .आनंद मेळाव्याचे आयोजन दिपाली खोडके,सोनाली ठाकरे, गोपाल खाडे,पुष्पा व्यवहारे, संजीवनी सोळंके, निर्मला शेरेकर, माधुरी दुधे, नीता तोडकर, विजया उगले, ममता जयस्वाल, शीतल काळे व पुरुषोत्तम दाहेदार यांनी केले होते.या आनंद मेळाव्यात जवळपास ७० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. तर रानभाज्या खाद्यमहोत्सवामध्ये दहा विद्याथीर्नी आपला सहभाग नोंदविला.रानभाज्यांमध्ये चाकवत, चवळी, अंबाडी, चिली, दाळिंबी, हेटा, चमकुरा, तांदुळजिरा, शेवगा, काठेमाठ, चोपडामाठ या भाज्यांचा समावेश होता.या भाज्या विद्यार्थिनींनी बनवून आणल्या. त्यासोबत तांदूळ, ज्वारी,बाजरी, मिसळीच्या विविध प्रकारच्या भाकरी खास आकर्षण होते. विद्याथीर्नींनी पदार्थ कसे बनवायचे याबाबत सुद्धा उपस्थित विद्यार्थ्यांना माहिती दिली .
याशिवाय या भाज्यांची आपल्या जीवनामध्ये असलेले आरोग्यदायी महत्त्वसुद्धा विद्यार्थिनींनी इतरांना समजावून सांगितले.आनंद मेळाव्यात सुद्धा विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे पौष्टिक पदार्थ बनवून आणले होते.कोणतेही काम कमी प्रतीचे नसते व श्रम करणा?्या लोकांबद्दल विद्यार्थ्यांमध्ये आदर निर्माण व्हावा,विद्यार्थ्यांना विविध रानभाज्यांची माहिती होऊन त्याचे महत्त्व त्यांना कळावे यासाठी या बालआनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी याबद्दल विद्यार्थी तथा शिक्षकांचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या यशाची आयोजनकरीता शिक्षक तथा विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.