‘चेतन सेवाकुर’साठी पुणे येथून पाठविले अन्नधान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:41 AM2021-05-13T04:41:33+5:302021-05-13T04:41:33+5:30
वाशीम : जिल्हा व सत्रन्यायाधीश पदावरून वाशीम येथून सेवानिवृत्त झालेले दिलीप देशमुख यांची कन्या फ्लाईंग ऑफिसर ...
वाशीम : जिल्हा व सत्रन्यायाधीश पदावरून वाशीम येथून सेवानिवृत्त झालेले दिलीप देशमुख यांची कन्या फ्लाईंग ऑफिसर दामिनी देशमुख हिने वाशीम येथील चेतन सेवाकुर या अंध मुलांच्या संगीत रजनीमध्ये कार्यरत व केकत उमरा येथील पांडुरंग उचितकर यांच्यासह राहणाऱ्या १५ अंध मुलांना दोन महिने पुरेल एवढे अन्नधान्य वाशीम येथील न्यायालयातील कर्मचारी अरुण चव्हाण व मोहन पन्नासे यांच्याहस्ते पाठवून, या अंध मुलांना आधार दिला आहे.
कोरोना काळात गेल्या एक वर्षापासून या मुलांचे संगीत रजनीचे कार्यक्रम बंद आहेत. येथे राहणाऱ्या १५ अंध मुलांच्या उपजीविकेचे साधनच हिरावून घेतले गेले होते. गेल्यावर्षी सुद्धा कोरोनाच्या काळात वाशीम येथे सेवारत असताना न्यायाधीश दिलीप देशमुख यांनी पांडुरंग उचितकर यांच्या चेतन सेवाकुरला मदत केली होती. तसेच त्यांच्या कार्यकालात वाशीम जिल्ह्यात अनेक सामाजिक उपक्रम राबविले होते. दोन महिने पुरेल एवढे गहू, तांदुळ, विविध डाळी, रवा, पोहे, तेल, कांदा, लसूण हे दररोज लागणारे अन्न -धान्य पाठविले आहे. सध्याच्या कडक निर्बंघाच्या काळात या अंध मुलांना याचा खूपच आधार मिळाला आहे.