काजळेश्वरातील बचत गटाच्या पदार्थांनी तालुका प्रदर्शनात वेधले लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 05:16 AM2021-03-13T05:16:44+5:302021-03-13T05:16:44+5:30
कारंजा पंचायत समितीत महिला बचतगटांनी गृहउद्योगांतर्गत तयार केलेल्या पदार्थांचे प्रदर्शन बुधवारी आयोजित केले होते. यात तालुकाभरातील अनेक बचत गटांनी ...
कारंजा पंचायत समितीत महिला बचतगटांनी गृहउद्योगांतर्गत तयार केलेल्या पदार्थांचे प्रदर्शन बुधवारी आयोजित केले होते. यात तालुकाभरातील अनेक बचत गटांनी तयार केलेले विविध पदार्थ ठेवण्यात आले होते. कोरोना नियमांचे पालन करून आयोजित केलेल्या प्रदर्शनात काजळेश्वर येथील स्त्रीशक्ती बचत गटानेही सहभाग घेतला होता. या बचत गटाने मूग, उडीद, बाजरी, ज्वारी, हरभरा, साबुदाणा, बटाटे, तांदूळ, आदींपासून तयार खाद्यपदार्थ केले आहेत. त्यात पापड, मुंगवड्या, कुरवड्या, शेवया, खारोळ्या, ढोकळा पीठ, इडली पीठ, आदींचा समावेश आहे. त्यांच्या या पदार्थांची पाहणी अधिकाऱ्यांनी करून स्त्रीशक्ती बचतगटाचे कौतुक केले. या प्रदर्शनाला जि. प. सदस्य अशोकराव डोंगरदिवे, पं. स. सभापती सविता रोकडे, माजी जि. प. अध्यक्ष ज्योती गणेशपुरे यांच्यासह सोनल उपाध्ये, जमीरभाई, राजू पवार, आदींनी भेट दिली.