जिल्हाभरात फुटबॉल स्पर्धा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 01:41 AM2017-09-16T01:41:35+5:302017-09-16T01:41:43+5:30

वाशिम: ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन व फेडरेशन इंटरनॅशनल फुटबॉल असोसिएशन (फिफा) यांच्या संयुक्त विद्यमाने १५ सप्टेंबर रोजी ‘अवघा महाराष्ट्र फुटबॉलमय’ या संकल्पनेंतर्गत वाशिम जिल्हय़ात फुटबॉल स्पर्धा घेण्यात आल्या.

The football competition enthusiasm across the district | जिल्हाभरात फुटबॉल स्पर्धा उत्साहात

जिल्हाभरात फुटबॉल स्पर्धा उत्साहात

Next
ठळक मुद्देसकाळच्या सुमारास पावसाचा व्यत्यय फुटबॉलविषयी जनजागृतीचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन व फेडरेशन इंटरनॅशनल फुटबॉल असोसिएशन (फिफा) यांच्या संयुक्त विद्यमाने १५ सप्टेंबर रोजी ‘अवघा महाराष्ट्र फुटबॉलमय’ या संकल्पनेंतर्गत वाशिम जिल्हय़ात फुटबॉल स्पर्धा घेण्यात आल्या.
जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी व मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांच्या मार्गदर्शनात वाशिम जिल्हा क्रीडा संकुल येथे मुख्य कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. ज्ञानेश्‍वर नागरे होते. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी संजय पांडे, जिल्हा फुटबॉल संघटनेचे रफिक खान आदी उपस्थित होते. यावेळी आयोजित फुटबॉल स्पर्धेमध्ये शहरातील बाकलीवाल विद्यालय, श्री शिवाजी विद्यालय, लायन्स विद्या निकेतन, रेखाताई राष्ट्रीय विद्यालय, राणी लक्ष्मीबाई कन्या शाळा, स्काउट व गाइड्समधून सुमारे १ हजार विद्यार्थी, विद्यार्थिनी सहभागी झाले होते. जिल्हय़ातील माध्यमिक शाळांमध्येदेखील फुटबॉल स्पर्धा घेण्यात आल्या, अशी माहिती शिक्षणाधिकारी डॉ. नागरे यांनी दिली. पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील म्हणाल्या की, फुटबॉल खेळण्यासाठी अतिशय कमी क्रीडा साहित्य लागते. केवळ एक बॉल असला तरी हा खेळ खेळता येतो. शारीरिक तंदुरुस्तीसाठी फुटबॉल हा खेळ सर्वाधिक उपयुक्त आहे. ‘महाराष्ट्र फुटबॉल मिशन वन मिलियन’च्या निमित्ताने फुटबॉलविषयी जनजागृती होण्यास मदत होईल. माध्यमिक शिक्षणाधिकारी  नागरे, जिल्हा क्रीडा अधिकारी पांडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 
दरम्यान, सकाळच्या सुमारास संततधार पाऊस असल्याने दुपारनंतर स्पर्धा घेण्यात आल्या. मैदानावर काही प्रमाणात पाणी असल्याने व्यत्यय निर्माण झाला होता.

Web Title: The football competition enthusiasm across the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.