तहसीलदाराची कृषी सेवा केंद्रावर धाड

By Admin | Published: August 18, 2016 12:34 AM2016-08-18T00:34:22+5:302016-08-18T00:34:22+5:30

रेशन धान्य काळ्या बाजारात नेले जात असल्याच्या संशय.

Forage at Tehsildar's Agriculture Service Center | तहसीलदाराची कृषी सेवा केंद्रावर धाड

तहसीलदाराची कृषी सेवा केंद्रावर धाड

googlenewsNext

मालेगाव (जि. वाशिम), दि. १७: शहरातील रेशन धान्याची विक्री काळया बाजारात होत असल्याच्या गुप्त माहितीवरून मालेगाव तहसिलदार सोनाली मेटकरी यांनी १७ ऑगस्ट रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती कॉम्प्लेक्समधील तिरुपती कृषी सेवा केंद्रावर धाड टाकली. या दुकानातील रेशनचा तांदूळ मेहकरला नेला. या दुकानामध्ये असलेल्या काही तांदळाचे नमूने घेवून चौकशी सुरु केली आहे.
शहरातून रेशनचा तांदूळ व गहू इतर तालुक्यात व परजिल्हयात काळया बाजारातमध्ये मोठया प्रमाणात विक्री केली जाते. याबाबत गुप्त माहिती मिळाल्यावरून तहसीलदार मेटकरी यांनी तिरुपती कृषी केंद्रावर धाड टाकली. तिरुपती कृषी केंद्राचे संचालक धिरज भांगडीया यांच्या कृषी केंद्राचे परवान्याची मुदत जून २0१६ रोजी संपली. अद्यापपर्यंंंत नुतनीकरण केले नसल्याने ते बंदच असल्याचे भांगडीया यांनी सांगितले. तहसिलदार मेटकरी, नायब तहसिलदार एस.एस.दुबे, धनंजय आवटे, एन.एस.निमंकडे, केंद्रे व दत्ता यांनी या कारवाईत सहभाग घेतला. दरम्यान, तहसिलदार मेटकरी यांनी कृषी केंद्रासंबंधी कृषी अधिकारी कव्हर यांना घटनास्थळी पाचारण केले. परवाना व नियमाबाबत अहवाल देउन योग्य कारवाई करण्याच्या सुचना केल्या. दुकानामध्ये काही औषधी आढळून आली. यासंदर्भात कृषी केंद्राचा व्यवसाय बंद करायचा होता. त्यामुळे परवान्याचे नुतनीकरण केले नाही, असे संचालक धीरज भांगडीया यांनी सांगितले. या कृषी सेवा केंद्राचा परवाना संपल्याने नियमानुसार दुकानाचे बोर्ड हटविणे आवश्यक होते. मात्र तसे झाले नाही. त्या अनुषंगाने चौकशी करण्यात येत असल्याचे तालुका कृषी अधिकारी कव्हर यांनी सांगितले.
दरम्यान, डोणगाव पोलिस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या अजनी बु. जवळ नायब तहसिलदार ए.एफ. सैय्यद यांनी मालेगावरुन जाणारा ७0 कट्टे तांदूळ १७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.३0 वाजताच्या दरम्यान पकडल्याचे वृत्त आहे. या तांदळाचे कनेक्शन मालेगावशी तर नाही ना? या दृष्टिकोनातून तपास होणे गरजेचे आहे.

Web Title: Forage at Tehsildar's Agriculture Service Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.