महावितरणकडून वीज देयकांची सक्तीने वसुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:39 AM2021-03-08T04:39:24+5:302021-03-08T04:39:24+5:30
विद्युत देयकांच्या वसुलीकरिता महावितरणने पथक नेमले असून, पथकातील कर्मचारी गावोगावी धडक देत आहेत. तालुक्यातील काही गावांमध्ये थेट वीजतारांवर आकडा ...
विद्युत देयकांच्या वसुलीकरिता महावितरणने पथक नेमले असून, पथकातील कर्मचारी गावोगावी धडक देत आहेत. तालुक्यातील काही गावांमध्ये थेट वीजतारांवर आकडा टाकून चोरी केली जात आहे. त्याचा भुर्दंड मात्र नियमित वीजदेयक भरणाऱ्या ग्राहकांना सहन करावा लागत आहे. अनेक ठिकाणी वीजतारा लोंबकळत आहेत. याकडेही महावितरणचे दुर्लक्ष होत असून, गावोगावी ध्वनिक्षेपकाव्दारे आवाहन करून वीजबिल भरा, कारवाई टाळा, असा संदेश देण्यात येत आहे. यासह थकबाकीदारांचा विद्युत पुरवठाही तोडण्यात येत आहे. याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
.............
कोट :
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात वीजबिलांबाबत सखोल चर्चा होईपर्यंत शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित करू नये, असे आदेश दिले आहेत; मात्र मार्च एंडिंगमुळे अधिकाऱ्यांवर दबाव असल्याने सक्तीने वसुली केली जात असेल; परंतु जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही, तोपर्यंत कोणाचीही वीज तोड़ू नये.
राजेद्र पाटणी, आमदार
..............
उपमुख्यमंत्र्यांनी कोणाची वीज तोड़ू नये, असे स्पष्ट आदेश दिले आहेत. तरीही महावितरणचे अधिकारी विद्युत पुरवठा खंडित करीत असतील, तर ही बाब योग्य नाही. शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा तोडू नये.
- आशिष पाटील
कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस