परराज्य, अन्य जिल्ह्यातील नागरिक अडकले नियमांच्या कचाट्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 10:52 AM2020-05-11T10:52:08+5:302020-05-11T10:52:14+5:30

बसची सुविधा केवळ ‘पॉर्इंट टू पॉर्इंट’ उपलब्ध करून देण्यात आली असून प्रवासी संख्या देखील २२ असेल तरच बस उपलब्ध होणार आहे.

 Foreigners, citizens of other districts are stuck in the conflict of rules! | परराज्य, अन्य जिल्ह्यातील नागरिक अडकले नियमांच्या कचाट्यात!

परराज्य, अन्य जिल्ह्यातील नागरिक अडकले नियमांच्या कचाट्यात!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : विविध स्वरूपातील व्यवसायानिमित्त, शिक्षणासाठी वाशिममध्ये वास्तव्यास असलेले नागरिक, विद्यार्थी, मजूर, कामगारांना आपापल्या घरी परतायचे आहे; मात्र रेल्वेचा प्रवास सद्या बंद आहे; तर एस.टी. बसची सुविधा केवळ ‘पॉर्इंट टू पॉर्इंट’ उपलब्ध करून देण्यात आली असून प्रवासी संख्या देखील २२ असेल तरच बस उपलब्ध होणार आहे. या नियमामुळे हजारो नागरिक जिल्ह्यात अडकले आहेत.
नियमबाह्य पद्धतीने ट्रकसह अन्य वाहनांमधून परराज्य, अन्य जिल्ह्यांमधून प्रवास करित असलेल्या सुमारे दीड हजार मजूरांना काही दिवस जिल्ह्यातील विविध ठिकाणी ठेवल्यानंतर प्रशासनाने विशेष रेल्वे, खासगी वाहनांनी त्या-त्या राज्याच्या सिमा व राज्यातील जिल्ह्यांमध्ये संबंधितांना रवाना केले. आता शासनाने एस.टी. परिवहन महामंडळाच्या बसमार्फत प्रवासी सेवा देखील उपलब्ध करून दिली; परंतु त्यासाठी नियमावली तयार करण्यात आली आहे. बस एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात थेट जाणार असून मधे कुठेही थांबणार नाही. यासह सुरक्षिततेच्या कारणास्तव बसमध्ये २२ पेक्षा अधिक प्रवासी बसविले जाणार नाहीत किंवा त्यापेक्षा कमी असतील तरी देखील बस उपलब्ध करून दिली जाणार नाही.
तथापि, वाशिम जिल्ह्यातील विशेषत: शहरी भागात परराज्य व अन्य जिल्ह्यांमधील अनेक नागरिक, विद्यार्थी, मजूर, कामगार वास्तव्यास आहेत; मात्र एकाच जिल्ह्यात किंवा एकाच राज्यात जाणाºया २२ प्रवाशांच्या एकाही गटाने अद्यापपर्यंत प्रशासनाकडे पास मिळण्याकरिता अर्ज सादर केलेला नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.
 
एस.टी. परिवहन महामंडळाची बससेवा एकाच राज्याच्या सिमेवर किंवा महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यांमध्ये ‘पॉर्इंट टू पॉर्इंट’ उपलब्ध असणार आहे. त्यासाठी घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करण्यासोबतच २२ प्रवासी संख्या असणे आवश्यक आहे. या नियमात बसणाऱ्यांनी प्रशासनाकडून पास मिळविण्याकरिता रितसर आॅनलाईन अर्ज केल्यास संबंधितांना परवानगी देण्यात येईल.
- हृषीकेश मोडक
जिल्हाधिकारी, वाशिम

Web Title:  Foreigners, citizens of other districts are stuck in the conflict of rules!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.