वनमंत्र्यांचा शेतकऱ्यांशी संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:37 AM2021-01-22T04:37:01+5:302021-01-22T04:37:01+5:30

------------ पिकांच्या क्षेत्रनिहाय माहितीचे संकलन उंबर्डा बाजार: जिल्ह्यातील ४३ गावांनी पाणी फाउंडेशनच्या समृद्ध गाव स्पर्धेत सहभाग घेतला आहे. या ...

Forest Minister interacts with farmers | वनमंत्र्यांचा शेतकऱ्यांशी संवाद

वनमंत्र्यांचा शेतकऱ्यांशी संवाद

Next

------------

पिकांच्या क्षेत्रनिहाय माहितीचे संकलन

उंबर्डा बाजार: जिल्ह्यातील ४३ गावांनी पाणी फाउंडेशनच्या समृद्ध गाव स्पर्धेत सहभाग घेतला आहे. या गावांत स्पर्धेतील कामांना प्रत्यक्ष सुरुवात झाली असून, स्पर्धेच्या माध्यमातून पीक उत्पादनात वाढ करण्यासाठी शेतीपिकांच्या क्षेत्रनिहाय माहितीचे संकलन कृषी विभागाकडून केले जात आहे. यात कारंजा तालुक्यातील तपोवन येथे गुरुवारी माहिती घेण्यात आली.

--------------

नाल्यांच्या सफाईअभावी आरोग्याला धोका

बांबर्डा कानकिरड : कारंजा तालुक्यातील बांबर्डा कानकिरड येथे नाल्यांची सफाई करण्याबाबत ग्रामपंचायत उदासीन असल्याने गुरुवारी सांडपाणी रस्त्यावर वाहताना दिसले. त्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका आहे. याची दखल प्रशासनाने घेण्याची मागणी होत आहे.

----------------

पोलिसांकडून वाहनांची तपासणी

वाशिम: रस्ता सुरक्षा अभियानाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील विविध मार्गांवर वाहनांची तपासणी पोलिसांकडून केली जात आहे. यात गुरुवारी शहरालगतच्या जागमाथा परिसरात पोलिसांनी वाहनांची तपासणी केली व नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १८ चालकांवर दंडात्मक कारवाईही केली. जिल्हा वाहतूक शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली.

--------------

पुसद-वाशिम मार्गावर वाहतूक कोंडी

वाशिम: जिल्ह्यातील महत्त्वाचा मार्ग असलेल्या वाशिम-पुसद मार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. यामुळे एकाच बाजूने वाहतूक सुरू असल्याने वाहनांची गर्दी होऊन वाहतुकीचा खोळंबा होत आहे. गुरुवारीही अनसिंग फाटा परिसरात वाहतुकीची कोंडी झाल्याचे चित्र दुपारच्या सुमारास पाहायला मिळाले.

----------

Web Title: Forest Minister interacts with farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.