दुधाळा येथील माजी सरपंचाची हत्या !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2020 12:10 PM2020-09-03T12:10:54+5:302020-09-03T12:11:13+5:30
माजी सरपंच कैलास खंडुजी गायकवाड यांची आरोपींनी धारदार शस्त्राने हत्या केल्याची घटना ३१ आॅगस्टच्या रात्री दरम्यान घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर जैन : शिरपूर येथून दुधाळा जात असताना, रिसोड रस्त्यावरील दुधाळा फाट्यावरून काही अंतरावर दुधाळा येथील माजी सरपंच कैलास खंडुजी गायकवाड यांची आरोपींनी धारदार शस्त्राने हत्या केल्याची घटना ३१ आॅगस्टच्या रात्री दरम्यान घडली. याप्रकरणी तीन आरोपींना अटक केली असून, ४ सप्टेंबरपर्यंत त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या दुधाळा येथील माजी सरपंच कैलास खंडुजी गायकवाड (वय ५२) हे शिरपूर येथे गेले होते. ते ३१ आॅगस्टच्या रात्री दरम्यान एम एच ३७ क्यू ८०५६ क्रमांकाच्या दुचाकीने शिरपूर येथून दुधाळा गावाकडे जात होते. रिसोड ते मालेगाव रस्त्यावरील दुधाळा गावानजीक एका हॉटेलजवळ पंढरी देवबा गायकवाड, हरिभाऊ आनंदा गायकवाड व शंकर उर्फ सुनील भगवान साखरे यांनी धारदार शस्त्राने कैलास गायकवाड यांची हत्या केली. त्यानंतर हॉटेलसमोरील नालीमध्ये मृतदेह टाकण्यात आला. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ पवन बनसोड व स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने घटनास्थळ गाठले. श्वानपथक व अन्य आवश्यक यंत्रणांना पाचारण करण्यात आले.
(वार्ताहर)