मेडशी ग्रामपंचायतीवर माजी सभापती शे. गनिभाई हाजी शे. चाँदभाई यांची सत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 05:17 AM2021-02-18T05:17:09+5:302021-02-18T05:17:09+5:30

१७ वर्षांपूर्वी शे. गनिभाई यांच्या गटाकडून डॉ सुभाष मंत्री सरपंच, तर शे. गनिभाई यांचे बंधू शे. रज्जाकभाई उपसरपंचपदी आरुढ ...

Former Speaker of Medashi Gram Panchayat Sh. Ganibhai Haji She. Power of Chandbhai | मेडशी ग्रामपंचायतीवर माजी सभापती शे. गनिभाई हाजी शे. चाँदभाई यांची सत्ता

मेडशी ग्रामपंचायतीवर माजी सभापती शे. गनिभाई हाजी शे. चाँदभाई यांची सत्ता

Next

१७ वर्षांपूर्वी शे. गनिभाई यांच्या गटाकडून डॉ सुभाष मंत्री सरपंच, तर शे. गनिभाई यांचे बंधू शे. रज्जाकभाई उपसरपंचपदी आरुढ झाले होते. दरम्यान, चालू महिन्यात १६ फेब्रुवारी रोजी सरपंच, उपसरपंचपदाची निवडणूक घेण्यात आली. यामध्ये गनिभाई यांच्या गटाकडून शे. जमीर शे. गनीभाई यांनी सरपंचपदासाठी, सोनाली धीरज मंत्री यांनी उपसरपंच पदासाठी अर्ज भरले. १२ सदस्यांच्या उपस्थितीत झालेल्या निवडणुकीत शे. जमीर यांना ९ मते मिळाली. त्यांच्याविरूद्ध असलेले अभिजित मेडशीकर यांना केवळ ३ मतांवर समाधान मानावे लागले. उपसरपंच पदासाठी सोनाली मंत्री यांना ९ मते मिळाली, त्यांच्याविरुद्ध उभे असलेले कैलास ढाले यांनाही फक्त ३ मते मिळाली. यायोगे शे. गनिभाई शेख चाँदभाई यांनी एकहाती सत्ता मिळविली. अध्यासी अधिकारी म्हणून घनश्याम दलाल यांनी काम पाहिले. यावेळी ग्रामविकास अधिकारी भुतेकर, तलाठी बानाईत, घनश्याम साठे, ताजने यांची उपस्थिती होती.

Web Title: Former Speaker of Medashi Gram Panchayat Sh. Ganibhai Haji She. Power of Chandbhai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.