जिल्हा परिषदेत फॉर्म्यूला बदलला; उपाध्यक्षांकडे शिक्षण व आरोग्य खाते!

By संतोष वानखडे | Published: November 3, 2022 05:47 PM2022-11-03T17:47:31+5:302022-11-03T17:48:39+5:30

अडीच वर्षांपूर्वी जिल्हा परिषद उपाध्यक्षकांकडे असलेल्या कृषी व पशुसंवर्धन खात्यात गुरूवारी (दि.३) आपसी बदल झाला असून, आता उपाध्यक्ष चक्रधर गोटे यांचेकडे शिक्षण व आरोग्य खाते आले आहे.

formula changed in vashim Zilla Parishad; Education and health accounts for the vice president! | जिल्हा परिषदेत फॉर्म्यूला बदलला; उपाध्यक्षांकडे शिक्षण व आरोग्य खाते!

जिल्हा परिषदेत फॉर्म्यूला बदलला; उपाध्यक्षांकडे शिक्षण व आरोग्य खाते!

Next

वाशिम : अडीच वर्षांपूर्वी जिल्हा परिषद उपाध्यक्षकांकडे असलेल्या कृषी व पशुसंवर्धन खात्यात गुरूवारी (दि.३) आपसी बदल झाला असून, आता उपाध्यक्ष चक्रधर गोटे यांचेकडे शिक्षण व आरोग्य खाते आले आहे. सभापती सुरेश मापारी यांच्याकडे पूर्वीचेच अर्थ व बांधकाम तर सभापती वैभव सरनाईक यांच्याकडे कृषी व पशुसवंर्धन खाते सोपविण्यात आले.

जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापती पदाची निवडणूक झाल्यानंतर, ३ नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषदेच्या विशेष सभेतून सभापतींचे खातेवाटप करण्यात आले. सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे होते. अडीच वर्षांपूर्वी अर्थ व बांधकाम खाते शिवसेनेकडे (उद्धव ठाकरे गट) तर काँग्रेसकडे शिक्षण व आरोग्य आणि कृषी व पशुसंवर्धन असे दोन खाते होते. अर्थ व बांधकाम, शिक्षण व आरोग्य तसेच कृषी व पशुसंवर्धन या तीन विषय समितींपैकी कोणती समिती कोणाला मिळते, समितीत बदल होणार की जैसे थे परिस्थिती राहणार? याची शिगेला पोहचलेली उत्सुकता गुरूवारी संपुष्टात आली. कोणत्या पक्षाला कोणती विषय समिती द्यावयाची याचा अडीच वर्षांपूर्वीचाच फाॅर्म्यूला यावेळीही कायम राहिला. मात्र, काॅंग्रेसच्या वाट्यावर असलेल्या विषय समितीत बदल झाला.

यापूर्वी जिल्हा परिषद उपाध्यक्षांकडे कृषी व पशुसंवर्धन खाते तर सभापतींकडे शिक्षण व आरोग्य खाते सोपविले होते. हाच फाॅर्म्यूला कायम राहिल की यामध्ये बदल होईल, याबाबत बरीच चर्चा रंगली होती. मागील पाच वर्षे शिक्षण व आरोग्य खाते सांभाळल्याने या खात्याविषयी उपाध्यक्ष चक्रधर गोटे आग्रही असल्याचे सांगण्यात येत होते. दुसरीकडे वैभव सरनाईक यांनादेखील शिक्षण व आरोग्य खाते देऊन आणखी उभारी दिली जाईल, असे सांगण्यात येत होते. गुरूवारी झालेल्या खातेवाटपात चक्रधर गोटे यांना झुकते माप देत शिक्षण व आरोग्य खाते सोपविण्यात आले तर वैभव सरनाईक यांना कृषी व पशुसंवर्धन खाते मिळाले. सुरेश मापारी यांना यापूर्वीचेच अर्थ व बांधकाम खाते मिळाले.

रिक्त जागांवर जून्यांना संधी

जिल्हा परिषदेत अर्थ, बांधकाम, शिक्षण, आरोग्य, कृषी, पशुसंवर्धन, समाजकल्याण, महिला व बालकल्याण, स्थायी, जलसंधारण अशा एकूण १० विषय समिती आहेत. या समित्यांमध्ये सदस्य म्हणून जिल्हा परिषद सदस्यांची वर्णी लागते. अडीच वर्षानंतर काही सदस्य सभापती झाल्याने त्या-त्या समितीमधील त्यांची जागा रिक्त झाली आहे. या जागेवर यापूर्वीच्या सभापतींना सदस्य म्हणून संधी देण्यात आली.

Web Title: formula changed in vashim Zilla Parishad; Education and health accounts for the vice president!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.