हरभऱ्यावर घाटेअळीचे आक्रमण; ढगाळ वातावरणाचा परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2018 02:09 PM2018-12-07T14:09:53+5:302018-12-07T14:10:32+5:30
वाशिम: गेल्या आठवडाभरापासून पश्चिम वऱ्हाडात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. या वातावरणाचा फटका तुरीच्या पिकासह भाजीपाला पिकांना बसला असतानाच आता या वातावरणामुळे रब्बी हंगामातील हरभरा पिकावरही घाटेअळीचा प्रादूर्भाव होत आहे.
लोेकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: गेल्या आठवडाभरापासून पश्चिम वऱ्हाडात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. या वातावरणाचा फटका तुरीच्या पिकासह भाजीपाला पिकांना बसला असतानाच आता या वातावरणामुळे रब्बी हंगामातील हरभरा पिकावरही घाटेअळीचा प्रादूर्भाव होत आहे. यामुळे या पिकाचे उत्पादन घटण्याची शक्यता असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
पश्चिम वºहाडातील अकोला, बुलडाणा आणि वाशिम जिल्ह्यात रब्बी हंगामात हरभरा पीक अधिक प्रमाणात घेतले जाते. यंदाही या तीन जिल्ह्यात हरभरा पिकाचे क्षेत्र अधिकच आहे. हे पीक घाटे आणि फुलांवर असताना ढगाळ वातावरण तयार झाले आहे. ढगाळ वातावरणामुळे हरभरा पिकावर घाटे अळी (हेलिकोव्हर्पा आर्मिजेरा) प्रादुर्भाव वाढत आहे. या किडीमुळे घाट्यांचे प्रमाण कमी होऊन उत्पादनात घट येण्याची भिती निर्माण झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. दरम्यान, या अळीवर नियंत्रणासाठी कृषी विभागाकडून उपाय योजना सुचविण्यात येत असून, अळी लहान अवस्थेत असेल, तर नियंत्रणासाठी हेलिओकील ५०० मि.लि. ५०० लिटर पाण्यात मिसळून प्रति हेक्टरी फवारावे किंवा क्विनॉलफॉस दोन मि.लि. प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारावे. अळी मोठ्या अवस्थेत असेल, तर रॅनॅक्झीपार दोन मि.लि. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे. प्रामुख्याने ही फवारणी सायंकाळी किंवा सकाळच्या क्षेत्रात करण्याचा सल्ला कृषी विभागाकडून देण्यात येत आहे. दरम्यान, ढगाळ वातावरणासह दाट धुक्यामुळे हरभºयाची फुलगळ होत आहे. या परिस्थितीत हरभºयाला तुषार सिंचनाने पाणी दिल्यास किंवा फवारणी पंपाने पाणी फवारल्यास पानावरील धुके निघून नुकसान टाळणे शक्य होईल, असेही कृषीतज्ञांकडून सांगण्यात येत आहे.
गेल्या चार पाच दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने हरभरा पिकावर काही अंशी घाटेअळीचा प्रादूर्भाव होत आहे. यावर वेळीच नियंत्रणासाठी शेतकºयांनी कृषी अधिकाºयांच्या सल्ल्यानुसार फवारणी करावी. वेळीच नियंत्रण मिळविल्यास नुकसान टाळणे शक्य होणार आहे.
दत्तात्रय गावसाने
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी
वाशिम