हरविलेल्या ५२ व्यक्तिंना शोधून काढले! वाशिम ग्रामीण पोलिसांचं उल्लेखनीय कार्य

By संतोष वानखडे | Published: December 30, 2023 03:59 PM2023-12-30T15:59:12+5:302023-12-30T15:59:44+5:30

६ अल्पवयीन मुली व ४६ मिसिंग व्यक्तींचा शोध घेऊन परत पालक व नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

Found 52 missing people! Remarkable work of vashim Rural Police | हरविलेल्या ५२ व्यक्तिंना शोधून काढले! वाशिम ग्रामीण पोलिसांचं उल्लेखनीय कार्य

हरविलेल्या ५२ व्यक्तिंना शोधून काढले! वाशिम ग्रामीण पोलिसांचं उल्लेखनीय कार्य

वाशिम : हरविलेल्या, पळवून नेलेल्या व्यक्तिंचा, अल्पवयीन मुला-मुलींचा शोध घेण्यासाठी वाशिम ग्रामीण पोलिस स्टेशनच्या चमूने विशेष पथके कार्यरत केले असून, वर्षभरात ५२ ‘मिसिंग’ व्यक्तिंना परत पालक व नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

विविध कारणांमुळे कोणी घरातून निघून जातो तर कोणाला पळवून नेले जाते. हरविलेल्या व्यक्तिंबाबत पोलिस स्टेशन, मिसिंग डेस्ककडे तक्रार नोंदवून घेतली जाते. अपहृत बालकांसंदर्भात संबंधित पोलिस स्टेशन तसेच अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडूनही तक्रार नोंदवून घेतली जाते. पोलिस अधीक्षक अनुज तारे यांच्या मार्गदर्शनात हरविलेल्या व पळवून नेलेल्या व्यक्तिंचा शोध घेण्यासाठी वाशिम ग्रामीण पोलिस स्टेशनकडून विषेश शोध मोहिम राबविली जात आहे. वर्षभरात पुणे, मुंबई, नाशिक आदी ठिकाणांवरून ६ अल्पवयीन मुली व ४६ मिसिंग व्यक्तींचा शोध घेऊन परत पालक व नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

गहाळ मोबाईल परत
वाशिम ग्रामीण पोलिस स्टेशनअंतर्गत वर्षभरात १६ गहाळ मोबाईल मूळ मालकास परत करण्यात आले. २९ डिसेंबर रोजी ७ जणांचे गहाळ मोबाईल शोधून मूळ मालकास देण्यात आले.

वर्षभरात ६ अल्पवयीन मुली व ४६ मिसिंग पर्सनचा शोध पुणे, नाशिक, मुंबई येथे घेऊन परत पालक व नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. तसेच वर्षभरात एकूण १६ मोबाईल मूळ मालकास परत करण्यात आले.
प्रमोद इंगळे
ठाणेदार, ग्रामीण पोलिस स्टेशन, वाशिम

Web Title: Found 52 missing people! Remarkable work of vashim Rural Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस