चार एकरातील पिकात साचले गुडघाभर पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2019 05:49 PM2019-09-27T17:49:41+5:302019-09-27T17:49:50+5:30
शेतकºयाच्या चार एकर क्षेत्रातील कपाशी व सोयाबीनच्या पिकात गुडघाभर उंच पाणी साचले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
इंझोरी (वाशिम) : जिल्ह्यातील अनेक भागांत गुरुवार २६ सप्टेंबर रोजी जोरदार पाऊस पडला. या पावसामुळे नदी, नाल्यांना पूर जाऊन शेतकºयांचे अतोनात नुकसान झाले. यात मानोरा तालुक्यातील इंझोरी येथे आलेल्या नाल्याच्या पुराचे पाणी शेतात घुसले असून, आनंद तोतला या शेतकºयाच्या चार एकर क्षेत्रातील कपाशी व सोयाबीनच्या पिकात गुडघाभर उंच पाणी साचले आहे. त्यामुळे अतोनात नुकसान झाल्याने ते हताश झाले आहेत. या नुकसानाची पाहणी पीकविमा कंपनी आणि प्रशासनाने करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
ुमानोरा तालुक्यातील इंझोरी शिवारात गत काही दिवसांपासून सतत पाऊस पडत असल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. त्यात २५ आणि २६ सप्टेंबर रोजी या परिसरात जोरदार पाऊस पडला. त्यामुळे इंझोरी येथील दापुरा-इंझोरी नाल्याला पूर गेला. या पुरात अनेक शेतकºयांची शेतीच खरडून पिकांचे अतोनात नुकसान झाले. त्यातच येथील शेतकरी आनंद तोतला यांच्या चार एकर क्षेत्रातील सोयाबीन व कपाशी पूर्णपणे उद्धस्त झाली असून, त्यांच्या शेतात अद्यापही गुडघ्याएवढे उंच पाणी साचले आहे. त्यामुळे या पिकातून आता कवडीचेही उत्पन्न होण्याची शक्यता उरलेली नाही. त्यामुळे या शेतकºयाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. कृषी व महसूल विभागासी पीकविमा कंपनीने या नुकसानाची पाहणी करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी या शेतकºयाने केली आहे.