साडे चार हजारांवर शेतकऱ्यांना तूर, हरभरा चुकाऱ्याची प्रतिक्षा कायम 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2018 12:52 PM2018-08-05T12:52:31+5:302018-08-05T12:53:48+5:30

For four and a half thousand farmers, waiting for payment | साडे चार हजारांवर शेतकऱ्यांना तूर, हरभरा चुकाऱ्याची प्रतिक्षा कायम 

साडे चार हजारांवर शेतकऱ्यांना तूर, हरभरा चुकाऱ्याची प्रतिक्षा कायम 

Next
ठळक मुद्दे ५ हजार ५१४ शेतकऱ्यांकडून ८१ हजार ३४९ क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली.३ मे रोजी बंद झालेल्या या खरेदीतील ४०५७ शेतकऱ्यांना तुरीचे चुकारे अदा करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: बाजारात होणारे नुकसान टाळण्यासाठी हजारो शेतकऱ्यांनी नाफेडकडे हमीभावाने तूर, हरभऱ्याची विक्री केली; परंतु आता दोन महिने उलटत आले तरी, जिल्ह्यातील ४७६४ शेतकऱ्यांना हरभरा आणि तुरीच्या चुकाऱ्यातील दमडीही मिळाली नाही. प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे शेतकऱ्यांना यंदाच्या खरीप हंगामासाठी सावकारी कर्जही काढावे लागले.
वाशिम जिल्ह्यात नाफेडच्यावतीने ५ हजार ५१४ शेतकऱ्यांकडून ८१ हजार ३४९ क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली. १३ मे रोजी बंद झालेल्या या खरेदीतील ४०५७ शेतकऱ्यांना तुरीचे चुकारे अदा करण्यात आले. तर अद्यापही १४५७ शेतकऱ्यांना त्यांनी विकलेल्या तुरीचे चुकारे अद्यापही मिळाले नाहीत. त्याशिवाय जिल्ह्यातच नाफेडच्यावतीने ३३९४ शेतकऱ्यांकडून ५६ हजार ६३१ क्विंटल २३ किलो हरभºयाची खरेदी करण्यात आली. या खरेदीतील के वळ ८७ शेतकºयांना चुकारे अदा करण्यात आले, तर अद्यापही तब्बल ३३०७ शेतकºयांना हरभºयाच्या चुकाºयाची प्रतिक्षाच आहे. अर्थात नाफेडकडे तूर आणि हरभरा विक्री करणाऱ्या एकूण ४७६४ शेतकºयांना चुकारे मिळण्याची प्रतिक्षाच आहे.

Web Title: For four and a half thousand farmers, waiting for payment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.