वाशिम येथील शस्त्रसाठा प्रकरणातील आरोपीला चार दिवसाची कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2017 07:16 PM2017-11-03T19:16:30+5:302017-11-03T19:17:46+5:30
वाशिम : शहरातील माहुरवेस परिसरातील मुकेश उर्फ बबलू राजू गायकवाड याचे घरामधुन पोलीसांनी १९ तलवार व १८ कत्ते असे एकुण ३७ धारदार शस्त्रे हस्तगत केले होते. याप्रकरणी विद्यमान न्यायालयाने गायकवाड याला २ नोव्हेंबर रोजी चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : शहरातील माहुरवेस परिसरातील मुकेश उर्फ बबलू राजू गायकवाड याचे घरामधुन पोलीसांनी १९ तलवार व १८ कत्ते असे एकुण ३७ धारदार शस्त्रे हस्तगत केले होते. याप्रकरणी विद्यमान न्यायालयाने गायकवाड याला २ नोव्हेंबर रोजी चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.
वाशिम शहरातील माहुरवेस परिसरात वास्तव्यास असलेला १९ वर्षीय बबलू गायकवाड हा अवैधरित्या शस्त्रे विक्रीचा व्यवसायक करत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारावर १ नोव्हेंबरला पोलीसांनी गायकवाड याचे घरावर छापा टाकला होता. या छाप्यामध्ये त्याचे घरातील सज्जावर १९ तलवार व १८ कत्ते आढळून आले. पोलीसांनी या शस्त्रासह बबलू गायकवाड याला अटक करून त्याचे विरूध्द भादंविचे कलम ४/२५ आर्म अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी गायकवाड याला जिल्हा न्यायालयात हजर केले असता न्यायाधिशांनी गायकवाड याला चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावन्यात आल्याची माहिती पोलीसांनी दिली.
नांदेड जिल्ह्यातून होते शस्त्रांची खरेदी
नांदेड जिल्ह्यामध्ये तलवार व ईतर धारदार शस्त्रे तयार करून ती विकणारी टोळी कार्यरत आहे. या टोळीसोबत गायकवाड याचे संबंध असल्याची माहिती समोर येत आहे. नांदेड जिल्ह्यामधून गायकवाड याला कुणी शस्त्रे विकली याचा शोध घेण्याचे आव्हान पोलीसांसमोर उभे आहे.
शस्त्र विक्रीचा अवैध व्यवसाय
वाशिम शहर पोलीसांनी गायकवाड याला अटक केल्यानंतर त्याच्याकडून धक्कादायक माहिती समोर येत आहे. गायकवाड गेल्या दोन-तीन वर्षापासून शस्त्रे विक्रीचा अवैध व्यवसाय करत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली आहे.