कारंजा उपजिल्हा रुग्णालयात चार डॉक्टर आढळले गैरहजर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2020 03:49 PM2020-09-20T15:49:16+5:302020-09-20T15:49:24+5:30
गैरहजर राहणाºया डॉक्टरांवर कारवाई करावी असा अहवाल तहसिलदारांनी जिल्हाधिकाºयांकडे १९ सप्टेंबर रोजी सादर केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा लाड (वाशिम) : तहसिलदार व नगर परिषदेच्या अधिकाºयांनी १९ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजतादरम्यान केलेल्या पाहणीत कारंजा उपजिल्हा रुग्णालयातील चार वैद्यकीय अधिकारी (डॉक्टर) गैरहजर आढळून आले. तहसिलदार धीरज मांजरे यांनी यासंदर्भातचा अहवाल जिल्हाधिकाºयांकडे सादर केला असून, यावर कोणती कारवाई होते, याकडे लक्ष लागून आहे.
कारंजा येथील उपजिल्हा रुग्णालयात नवजात बालकाचा मृत्यू झाल्यामुळे रुग्णालयात धाव घेत मृतकाच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला. मृतदेह ताब्यात घेत नसल्याच्या माहितीवरून तहसिलदार धीरज मांजरे, नगर परिषदेचे अधिकारी स्वप्नील खामकर यांनी शनिवारी उपजिल्हा रुग्णालय गाठून नातेवाईकांची समजूत काढली. यावेळी मांजरे यांनी प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ भाऊसाहेब लहाने यांना सर्व वैद्यकीय अधिकाºयांची बैठक तातडीने आयोजित करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार बैठक घेण्यात आली. त्यानुसार डॉ जयंत पाटील हे १४ सप्टेंबरपासून, डॉ. दयाराम चव्हाण व डॉ. पूजा गजरे हे १८ सप्टेंबरपासून गैरहजर तर डॉ मधुकर मडावी हे १९ सप्टेंबर रोजी गैरहजर असल्याचे आढळून आले. ४ महत्वाचे डॉक्टर हे विनापरवानगी गैरहजर आढळून आले. त्यामुळे ते बैठकीला येऊ शकले नाही, असे वैद्यकीय अधीक्षक लहाने यांनी सांगितले. गैरहजर राहणाºया डॉक्टरांवर कारवाई करावी असा अहवाल तहसिलदारांनी जिल्हाधिकाºयांकडे १९ सप्टेंबर रोजी सादर केला. या अहवालानुसार त्या चारही वैद्यकीय अधिकाºयांवर कोणती कारवाई होते, याकडे तालुकावासियांचे लक्ष लागून आहे.