अतिक्रमण निर्मुलन मोहीमेदरम्यान चार अतिक्रमकांनी घेतला विषाचा घोट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 05:58 PM2018-08-03T17:58:04+5:302018-08-03T18:16:59+5:30
मानोरा (वाशिम) : तालुक्यातील भोयणी ग्रामपंचायतच्यावतीने परिसरातील ई क्लास शेत जमिनीवरील अतिक्रमण पोलीस बंदोबस्तात हटविण्यात येत असताना चार अतिक्रमकांनी विष प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवार ३ आॅगस्ट रोजी दुपारच्यावेळी घडली.

भोयणी ग्रामपंचायतच्यावतिने परिसरातील शेतजमिनीवरील अतिक्रमण हटविण्यासाठी सर्व कायदेशिर बाबी पूर्ण करुन ३ आॅगस्ट रोजी पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण काढण्याचे ठरले होते. त्यानुसार पोलीस बंदोबस्तात दुपारच्यावेळी अतिक्रमण निर्मुलन मोहीमेस सुरुवात करण्यात आली. गावातील २३ अतिक्रमणापैकी १६ अतिक्रमकांचे अतिक्रमण पोलीस बंदोबस्तात व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत काढण्यात आले. उर्वरित अतिक्रमण काढण्यासाठी जात असतानाच अतिक्रमक उत्तम भिकाजी घवने, देवराव भिकाजी घवने, नर्मदा उत्तम घवने, अन्नपूर्णा देवराव घवने यांनी विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. ही बाब पोलीसांच्या लक्षात येताच पोलीस निरिक्षक डी.आर. बावनकर यांनी त्यांना तातडीने कारंजा ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ हलविले. त्यांच्यावर प्राथमिक उपचारानंतर अमरावती येथील रुग्णालयात पाठविण्यात आले. यानंतर अतिक्रमण हटाव मोहीम थांबविण्यात आली. या मोहीमेत तलाठी, ग्रामसेवक, सरपंच, पोलीस पाटील उपस्थित होते.