फेब्रुवारीच्या तुलनेत मार्चमध्ये कोरोना संसर्गात चौपटीने वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:38 AM2021-04-03T04:38:03+5:302021-04-03T04:38:03+5:30
जिल्ह्यात २ एप्रिल २०२० ते २ एप्रिल २०२१ या वर्षभराच्या कालावधीत १६६९९ व्यक्तींना कोरोना संसर्ग झाला. त्यापैकी १३ हजार ...
जिल्ह्यात २ एप्रिल २०२० ते २ एप्रिल २०२१ या वर्षभराच्या कालावधीत १६६९९ व्यक्तींना कोरोना संसर्ग झाला. त्यापैकी १३ हजार ८५२ व्यक्तींनी कोरोनावर मात केली तर १८८ व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालावरून स्पष्ट होत असून, अद्यापही २६५८ व्यक्ती कोरोना उपचाराखाली आहेत. त्यात यंदा जानेवारी महिन्यानंतर कोरोना संसर्गाची लाटच जिल्ह्यात उसळली असून, फेब्रुवारी महिन्यात एकूण १७९० व्यक्तींना कोरोना संसर्ग झाला, तर मार्च महिन्यात ही संख्या चौपटीने वाढून ७१४१ वर पोहोचली. त्यात वाशिम, रिसोड आणि मंगरुळपीर तालुक्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण लक्षणीय असल्याने आरोग्य विभागावरील ताण वाढला आहे.
--------
तीन तालुक्यांत प्रमाण अधिक
जिल्ह्यात मार्च महिन्यात कोरोना संसर्गाचा उद्रेक होऊ लागला. त्यात सुरुवातीला कारंजा तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली; परंतु गत १० दिवसांपासून कारंजातील बाधितांचे प्रमाण कमी होत असून, वाशिम, मंगरुळपीर आणि रिसोड तालुक्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढत आहे.
-----------------
आठवडाभरात २७०५ लोकांना कोरोना
गेल्या आठवडाभरात २७ मार्च ते २ एप्रिलपर्यंतच्या कालावधीत जिल्ह्यातील २७०५ व्यक्तींना कोरोना संसर्ग असल्याचे निदान झाले, तर याच कालावधीत १८५९ व्यक्तींनी कोरोनावर मात केली. अर्थात जिल्ह्यात कोरोना संसर्गातून बरे होण्याच्या तुलनेत कोरोना संसर्गाचे प्रमाण अधिक असल्याचे स्पष्ट होत आहे.
-----------
आठवडाभरातील स्थिती
तारीख बाधितांची संख्या बरे झालेल्यांची संख्या
(एप्रि ०२) - ३०६ -------------३०१
(एप्रिल ०१) - २२७८ -------------२०८
(मार्च ३१) - २१० -------------२४२
(मार्च ३०) - ३४२ -------------३५२
( मार्च २९) - २६९ -------------३७७
(मार्च २८) - २४७ -------------३२७
(मार्च २७) - २०७ -------------५७५