वाशिम तालुक्यात चार ग्रामपंचायतीत सरपंच, उपसरपंच महिलाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:49 AM2021-02-17T04:49:37+5:302021-02-17T04:49:37+5:30

वाशिम तालुक्यात मंगळवारी पार पडलेल्या सरपंच उपसरपंच निवडणुकीत कळंबा महाली ग्रामपंचायत सरपंचपदी रेखा संजय महाले तर उपसरपंचपदी श्रीमती गौकर्णा ...

In four gram panchayats in Washim taluka, only sarpanch and deputy sarpanch are women | वाशिम तालुक्यात चार ग्रामपंचायतीत सरपंच, उपसरपंच महिलाच

वाशिम तालुक्यात चार ग्रामपंचायतीत सरपंच, उपसरपंच महिलाच

Next

वाशिम तालुक्यात मंगळवारी पार पडलेल्या सरपंच उपसरपंच निवडणुकीत कळंबा महाली ग्रामपंचायत सरपंचपदी रेखा संजय महाले तर उपसरपंचपदी श्रीमती गौकर्णा नारायण महाले यांची निवड. काजळांबा ग्रामपंचायत सरपंचपदी गणेश पाटील उगले तर उपसरसरपंचपदी गजानन घाटोळ यांची अविरोध निवड झली. कोंडाळा झामरे ग्रामपंचायत सरपंचपदी गोदावरी गजानन मानवतकर तर उपसरपंचपदी रामदास अशोक झामरे यांची अविरोध निवड करण्यात आली. अनसिंग ग्रामपंचायत सरपंचपदी संतोष खंदारे तर उपसरपंचपदी आयुब पठाण यांची निवड करण्यात आली. सावरगाव जिरे ग्रामपंचायत सरपंचपदी करुणा गंगाराम पडघान तर उपसरपंचपदी अजय संजय बिटोडे यांची बिनविरोध निवड झाली. ब्रम्हा ग्रामपंचायत सरपंचपदी आशाबाई रतन मुसळे तर उपसरपंचपदी सुरेश रामचंद्रआप्पा चवरे यांची निवड झाली. उकळीपेन ग्रामपंचायत सरपंचपदी अन्नपूर्णा प्रल्हादराव भोयनवाड तर उपसरपंचपदी बबन आत्माराम जैताडे यांची निवड झाली. तांदळी ग्रामपंचायत सरपंचपदी अंजू वर्धमान कांबळे तर उपसरपंचपदी आनंदा निंबाजी कांबळे यांची निवड झाली. वाळकी जहागीर ग्रामपंचायत सरपंचपदी शीतल संजय डवळे तर उपसरपंचपदी शारदा मधुकर तांबे यांची निवड झाली.

Web Title: In four gram panchayats in Washim taluka, only sarpanch and deputy sarpanch are women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.