अकोला जिल्ह्यात मंगळवारी चौघांचा मृत्यू, २६१ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 07:42 PM2021-04-06T19:42:58+5:302021-04-06T19:43:10+5:30

Corona Cases in Akola : ६ एप्रिल रोजी आणखी चौघांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा ४७८झाला आहे.

Four killed in Akola district on Tuesday, 261 positive | अकोला जिल्ह्यात मंगळवारी चौघांचा मृत्यू, २६१ पॉझिटिव्ह

अकोला जिल्ह्यात मंगळवारी चौघांचा मृत्यू, २६१ पॉझिटिव्ह

Next

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, मंगळवार, ६ एप्रिल रोजी आणखी चौघांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा ४७८झाला आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये १५७, तर रॅपिड ॲन्टिजेन चाचण्यांमध्ये १०४ अशा एकूण २६१ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाल्याने आतापर्यंत कोरोनाबाधित होणाऱ्याची संख्या २९,२९५ वर पोहोचली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून मंगळवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ११४९ अहवाल प्राप्त झाले. यापैकी १५७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ९९२ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये अकोट येथील नऊ, महागाव बु., जठारपेठ, मलकापूर, कौलखेड व मूर्तिजापूर येथील प्रत्येकी पाच, मोठी उमरी, लहान उमरी, गुडदी रोड येथील प्रत्येकी चार, जुने शहर, सिंधी कॅम्प, खोलेश्वर, राऊतवाडी, सुकोडा, रतनलाल प्लॉट येथील प्रत्येकी तीन, चिखलगाव, दक्षतानगर, हिंगणा रोड, वाशीम बायपास, डाबकी रोड, पीकेव्ही क्वार्टर, खडकी, गजानन नगर, बाळापूर, जीएमसी आणि दाताळा येथील प्रत्येकी दोन, तर अंतरी, मांजरी, राधेनगर, बेलखेड, गोरक्षण रोड, शंकरनगर, नकाशी, कीर्तीनगर, खीरपुरी खु., मोहम्मद अली रोड, माधवनगर, सेलूबाजार, जवाहर नगर, गंगानगर, सुधीर कॉलनी, मनकर्णा प्लॉट, रेल, तुकाराम चौक, मुकुंद नगर, सस्ती, आलेगाव, टिळकरोड, तोष्णिवाल लेआऊट, गायत्री नगर, रुईखेड, दानापूर, चोहोट्टा, डेवडा, उरळ, केशवनगर, न्यू खेतान नगर, पहूरजिरा, रणपिसेनगर, हातगाव, लंघापूर, कंजरा, माना, शिवनी, मनबदा, गीतानगर, पारस, चतारी, बोरगाव मंजू येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

 

सायंकाळी गीतानगर, कमला नगर, शिवनी, शिवापूर, गोरक्षण रोड आणि कपिलवस्तू नगर येथील प्रत्येकी दोन, रघुवीर नगर, भौरद, टीटीएन कॉलेज, पारडी, मलकापूर, बोरगाव मंजू, कृषी नगर, अकोली जहागिर, केशव नगर, यशवंत नगर, जीएमसी, खडकी, शिर्ला, विवरा, पातूर आणि दताळा येथील प्रत्येकी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

 

चौघांचा मृत्यू

 

देवरावबाबा चाळ, अकोला येथील ६३ वर्षीय महिला व डाबकी रोड येथील ६२ वर्षीय पुरुष, अकोट येथील ६२ वर्षीय पुरुष व बाळापूर येथील ६० वर्षीय पुरुष अशा चौघांचा मंगळवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. चौघांननाही अनुक्रमे ५ एप्रिल, २७ मार्च, २ एप्रिल व १ एप्रिल रोजी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

 

३८७ जणांना डिस्चार्ज

आयकॉन हॉस्पिटल येथुन तीन, कोविड केअर सेंटर बार्शीटाकळी दोन, सहारा हॉस्पिटल तीन, आरकेटी आयुर्वेदिक कॉलेज एक, बॉईज होस्टेल दोन, हार्मनी हॉस्पिटल एक, अवघाटे हॉस्पिटल एक, बिडाडे हॉस्पिटल आठ, नवजिवन हॉस्पिटल आठ, ओझोन हॉस्पिटल दोन, सुर्यचंद्र हॉस्पिटल चार, अकोला ॲक्सिडेंट हॉस्पिटल चार, हॉटेल रिजेन्सी चार, आधार हॉस्पिटल मुर्तिजापुर दोन, स्कायलार्क हॉटेल तीन, इंदिरा हॉस्पिटल दोन, अकोट कोविड केअर सेंटर येथील दोन, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून २५ तर होम आयसोलेशन मधील ३१० अशा एकूण ३८७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

३,८२७ ॲक्टिव्ह रुग्ण

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २९,२९५ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल २४,९९० रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ४७८ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ३,८२७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

Web Title: Four killed in Akola district on Tuesday, 261 positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.