कारंजात चार लाखांचा अवैध औषध साठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:57 AM2021-02-20T05:57:08+5:302021-02-20T05:57:08+5:30
प्राप्त माहितीनुसार, औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त व्ही.डी. सुलोचेने यांच्या मार्गदर्शनात औषध निरीक्षक हेंमत मेटकर, औषध निरीक्षक संजय राठोड ...
प्राप्त माहितीनुसार, औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त व्ही.डी. सुलोचेने यांच्या मार्गदर्शनात औषध निरीक्षक हेंमत मेटकर, औषध निरीक्षक संजय राठोड यांनी १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या सुमारास जुने बसस्थानक परिसरात एका खासगी इमारतीत बनावट ग्राहक पाठवून तपासणी केली. यावेळी सदर इमारतीत अवैध औषधी साठा व काही प्रतिबंधात्मक गोळ्यादेखिल आढळून आल्या. त्याची किंमत साधारणत: चार लाख रुपयांचा आसपास आहे. दरम्यान, शहरात इतरही काही ठिकाणी असेच चुकीचे प्रकार सुरू असून औषध प्रशासन विभागाने विशेष लक्ष दिल्यास मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
..............
बॉक्स :
गर्भपाताच्या गोळ्यांची कारंजातून होते विक्री
अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये कारंजा येथून गर्भपाताच्या गोळ्यांची विक्री केली जात असल्याची जोरदार चर्चा आहे. कारंजा हचे गर्भपात गोळ्या विक्रीचे मुख्य केंद्र असल्याचे बोलले जात असून त्यादृष्टीने औषध प्रशासनाकडून तपास होणे आवश्यक असल्याचा सूर उमटत आहे.