पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीसह चौघांना कारावास
By admin | Published: May 6, 2017 01:39 AM2017-05-06T01:39:07+5:302017-05-06T01:39:07+5:30
हुंड्यासाठी छळ : वाशिम सत्र न्यायालयाचा निकाल
वाशिम : येथून जवळच असलेल्या तांदळी बु. येथील नवविवाहीतेच्या हुंडाबळीप्रकरणी पती संदीप दामोदर पडघान सह चार आरोपींना सङ्म्रम कारावासाची शिक्षा येथील जिल्हा सत्र न्यायालयाने ५ मे रोजी सुनावली.
दिपाली उर्फ सोनू हिचे २५ मे २0११ रोजी तांदळी बु. येथील संदीप पडघान यांचे सोबत लग्न झाले होते. लग्नांनंतर सासरी नांदावयास गेली असता २५ हजार रुपये हुंडयाची मागणी करुन सासरच्या मंडळीनी तिचा मानसिक व शारीरिक छळ केला. २ ऑगस्ट २0११ रोजी तिचे वडील तुळशिराम खिल्लारे मुलीच्या घरी पोहचले असता त्यांना दिपालीचा मृत्यू झाल्याचे कळाले. खिल्लारे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी पती संदीप दामोदर पडघान, सासरा दामोदर किसन पडघान, सासू रुधाबाई दामोदर पडघान व ननंद वंदना संतोष पट्टेबहादूर यांच्या विरुद्ध कलम ४९८ अ, ३0४ व ३४ भादवी अन्वये गुन्हा दखल करुन, तपासांती प्रकरण न्यायप्रविष्ठ केले. या प्रकरणात न्यायालयाने सरकार पक्षातर्फे एकूण १३ साक्षीदार तपासले. साक्षीपुराव्यावरुन गुन्हा सिद्ध झाल्यामुळे अतिरिक्त सत्र न्यायालयाने आरोपी संदीप पडघान, दामोदर पडघान, रुधाबाई पडघान व वंदना पट्टेबाहदूर, या चारही आरोपींना कलम ४९८ अ अन्वये तीन वर्षाचा कारावस व प्रत्येकी दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.