पूर्ववैमनस्यातून चार जणांवर प्राणघातक हल्ला
By Admin | Published: September 1, 2015 01:43 AM2015-09-01T01:43:00+5:302015-09-01T01:43:00+5:30
महागाव येथील घटना; तिघांची प्रकृती गंभीर
रिसोड : पूर्ववैमनस्यातून डव्हळे कुटुंबातील दोन सदस्यांनी जमधाडे कुटुंबातील चार जणांवर प्राणघातक हल्ला केला. यामधील तिघांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांना अकोला येथे उपचारार्थ हलविण्यात आले. ही घटना रिसोड तालुक्यातील महागाव येथे ३१ ऑगस्टच्या पहाटे ३.३0 वाजताच्या सुमारास घडली. महागाव येथील स्वस्त दुकानदार संजय तुकाराम डव्हळे यांचे देवानंद जमधाडे व प्र तीक जमधाडे यांच्यासोबत कंट्रोलचे माल वाटपावरुन वाद झाला होता. दोघांचेही घर एकमेकांचे घरासमोर आहेत. त्यातच एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याच्या संशयावरून डव्हळे व जमधाडे कुटुंबात धूसफुस सुरू होती. यामधून संजय डव्हळे व गजानन डव्हळे यांनी ३१ ऑगस्टला पहाटेच्या सुमारास देवानंद जमधाडे यांचे घरात घुसून मारहाण करणे सुरू केले. यात गजानन डव्हळे याने कोयत्याने (विळा) देवानंद यास मारहाण केली तर संजय डव्हळे याने कुर्हाडीचा घाव पुनम देवानंद जमधाडे हिच्या डोक्यावर मारला. पुनमची आई छायाबाई ही मारु नका म्हणून पुढे आली असता तिला जातीवाचक शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ही घटना घडत असताना शेजारी राहणारे सिद्धार्थ मनोहर जमधाडे व त्याची आजी वच्छलाबाई यांनी आरडाओरड करीत देवानंदचे घरी गाठले. वच्छलाबाईने अडविण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिलाही कोयत्याने मारले. यामध्ये वच्छलाबाईच्या हा ताची बोटे तुटली व कोयत्याचा दुसरा वार तिने खांद्याजवळ दंडावर झेलला. सिद्धार्थ जमधाडे याने पकडण्याचा प्रयत्न केला असता कोयता सोडून पळून गेला. या मारहाणी त जमधाडे कुटुंबातील वच्छलाबाई, देवानंद, पुनम हे गंभीर जखमी असून छायाबाईसुद्धा जखमी झाल्या. सर्व जखमींना प्राथमिक उपचार करुन अकोला येथे उ पचारासाठी हलविण्यात आले. संजय व गजानन डव्हळे हे दोन्ही आरोपी फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. घटनास्थळाला पोलीस अधीक्षक विनीता साहू, उ पविभागीय पोलीस अधिकारी संग्राम सांगळे, ठाणेदार एम.ए. रउफ यांनी भेट देऊन माहिती घेतली. सदर घटनेची तक्रार सिद्धार्थ मनोहर जमधाडे (वय ३0) यांनी दिल्यावरुन पोलिसांनी विविध कलमानुसार आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल केला. वृत्त लिहिस्तोवर आरोपीला अटक करण्यात आली नव्हती.