दिवाळी आणि छट सणानिमित्त सिकंदराबाद-रक्सोल विशेष एक्स्प्रेसच्या चार फेऱ्या
By दिनेश पठाडे | Published: November 10, 2023 08:38 PM2023-11-10T20:38:32+5:302023-11-10T20:38:59+5:30
ही गाडी वाशिममार्गे धावणार असल्याने स्थानिकांची सोय होणार
दिनेश पठाडे, वाशिम: दिवाळी आणि छट सणानिमित्त दक्षिण मध्य रेल्वेने सिकंदराबाद-रक्सोल दरम्यान विशेष एक्स्प्रेसच्या चार फेऱ्या सोडण्याचा निर्णय १० नोव्हेंबरला घेतला आहे. ही गाडी वाशिममार्गे धावणार असल्याने वाशिमकर प्रवाशांची दिवाळी सणात सोय होणार आहे.
गाडी क्रमांक ०७००१ सिकंदराबाद ते रक्सोल ही विशेष गाडी सिकंदराबाद येथून १२ आणि १९ नोव्हेंबरला रविवारी सकाळी १०:३० वाजता सुटेल. नांदेड-पूर्णा मार्गे वाशिम येथे रात्री ८:१० वाजता पोहचेल. रक्सोल येथे तिसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजता पोहचेल. या गाडीच्या दोन फेऱ्या होतील. तर गाडी क्रमांक ०७००२ रक्सोल-सिकंदराबाद ही विशेष गाडी रक्सोल येथून १४ आणि २१ नोव्हेंबरला मंगळवारी सायंकाळी १९:१५ वाजता सुटेल. वाशिम स्थानकावर तिसऱ्या दिवशी सकाळी ३: ५४ वाजता येऊन सिकंदराबाद इथे दुपारी १४:३० वाजता पोहचणार आहे. या गाडीच्या देखील २ फेऱ्या होणार आहेत. सिकंदराबाद-रक्सोल-सिकंदराबाद या गाडीच्या वाशिम मार्गे अप व डाऊन अशा ४ फेऱ्या होणार असल्याने वाशिमातील प्रवाशांना थेट प्रयागराज, वाराणसी, पाटलीपुत्र अशा ठिकाणी जाणे शक्य होणार आहे. ही रेल्वेगाडी अनारक्षित असून गाडीला २२ डब्बे असणार आहेत.
या स्थानकावर आहे थांबणार
सिकंदराबाद-रक्सोल-सिकंदराबाद या विशेष गाडीला बोलारम, मेडचल, अकनापेट, कामारेड्डी, निजामाबाद, बासर, मुदखेड, नांदेड, पूर्णा, वसमत, हिंगोली, वाशिम, अकोला, खंडवा, इटारसी, पिपरीया, प्रयागराज चौकी, पं.दीनदयाल उपाध्याय जं.(वाराणसी), बक्सर, पाटलीपुत्र, हाजीपूर, मुजफ्फरपूर आणि सीतामढी या स्थानकांवर थांबा असणार आहे.