वाशिम जिल्ह्यात चार हजारावर घरकुलांची कामे रखडली !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2020 11:04 AM2020-06-09T11:04:13+5:302020-06-09T11:04:22+5:30
रेतीचा अभाव असल्याने अनेक कामे रखडल्याचे सांगितले जाते.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत गत तीन, चार वर्षात जवळपास ४२५१ घरकुलांची कामे रखडली असून, सदर कामे पूर्ण करण्याच्या सूचना प्रशासनाने लाभार्थींना तसेच ग्रामस्तरीय यंत्रणेला यापूर्वीच दिल्या आहेत. रेतीचा अभाव असल्याने अनेक कामे रखडल्याचे सांगितले जाते.
गोरगरीब लाभार्थी, निराधार, बेघर, दारिद्र्यरेषेखालील लाभार्थींना पात्र ठरल्यानंतर घरकुलाचा लाभ दिला जातो. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत पात्र ठरल्यानंतरही जिल्ह्यातील जवळपास ४२५१ लाभार्थी आतापर्यंत घरकुलाची कामे पूर्ण करू शकले नाहीत. यामध्ये कारंजा तालुक्यातील ६९५, मालेगाव १००५, मंगरूळपीर ४३८, मानोरा ६६६, रिसोड १०४२ आणि वाशिम तालुक्यातील ४०५ घरकुलांचा समावेश आहे. रेती उपलब्ध नसणे व अन्य कारणांमुळे घरकुलांची कामे पूर्ण होऊ शकली नाहीत. आता ही कामे पूर्ण करावी, बेरोजगारांना या कामांवर रोजगार द्यावा, अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. (प्रतिनिधी)