चारचाकीची दुचाकीला धडक, एक ठार, एक गंभीर; शिरपूर-मालेगावर रोडवरील घटना

By दिनेश पठाडे | Published: December 15, 2023 05:41 PM2023-12-15T17:41:05+5:302023-12-15T17:41:29+5:30

शिरपूर येथील विनोद श्रीवास्तव व दगडू मोतीराम बाभणे हे शिरपूर येथून दुचाकीने बँकेच्या कामानिमित्त मालेगाव येथे जात होते.

Four-wheeler collides with two-wheeler, one killed, one seriously; Incident on Shirpur-Malegawar Road | चारचाकीची दुचाकीला धडक, एक ठार, एक गंभीर; शिरपूर-मालेगावर रोडवरील घटना

चारचाकीची दुचाकीला धडक, एक ठार, एक गंभीर; शिरपूर-मालेगावर रोडवरील घटना

वाशिम : रिसोड- मालेगाव राष्ट्रीय महामार्ग ४६१ बी वर शिरपूरनजीक एका चारचाकी वाहनाने दुचाकीस मागून जबर धडक दिल्याने एकजण गंभीर जखमी तर एकाचा मृत्यू झाल्याची घटना  १५ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजेच्या दरम्यान घडली.
 
शिरपूर येथील विनोद श्रीवास्तव व दगडू मोतीराम बाभणे हे शिरपूर येथून दुचाकीने बँकेच्या कामानिमित्त मालेगाव येथे जात होते. शिरपूर पासून दोन किलोमीटर अंतरावर रिसोडकडून मालेगावकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या एम.एच.३० एफ.२४८४ या चारचाकी वाहनाने त्यांच्या एम.एच.३७ एम ४६३४ या दुचाकीस पाठीमागून जबर धडक दिल्याने मागे बसलेले दगडू मोतीराम बाभणे (वय ५२) यांना जबर मार लागला, त्यांना उपचारासाठी अकोलाकडे नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. तर दुचाकी चालवणारा विनोद श्रीवास्तव (वय ४०)  हा युवक जखमी झाला.
 
दुचाकीस्वारास जबर धडक दिल्यानंतर चार चाकी वाहनाने तेथून पोबारा केला. सदर घटनेची माहिती ऑटो युनियनचे अध्यक्ष कैलास भालेराव यांनी तातडीने शिरपूर पोलिस स्टेशनला दिली. घटनेची माहिती मिळताच पो.हे.कॉ. अमोल घायाळ, सतीश चव्हाण, प्रवीण सेन्द्रे, विजय बोरकर यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.  खासगी रुग्णवाहिकेने जखमीला रुग्णालयात भरती करण्यात आले. सदर घटनेचा पुढील तपास शिरपूर पोलिस करीत आहेत. पोबारा केलेल्या वाहनाचा शोध घेण्याचे आव्हान शिरपूर पोलिसांसमोर आहे.

Web Title: Four-wheeler collides with two-wheeler, one killed, one seriously; Incident on Shirpur-Malegawar Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम