अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने चार महिला सन्मानित

By संतोष वानखडे | Published: March 29, 2023 05:47 PM2023-03-29T17:47:39+5:302023-03-29T17:48:26+5:30

यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांची प्रमुख उपस्थिती होती.

Four women honored with Ahilya Devi Holkar Award | अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने चार महिला सन्मानित

अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने चार महिला सन्मानित

googlenewsNext

संतोष वानखडे

वाशिम : महिला आणि बालकल्याण क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या सन २०१४ -१५ ते सन २०१७-१८ या कालावधीतील चार महिलांना जिल्हास्तरावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराचे वितरण २९ मार्च रोजी जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस.यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांची प्रमुख उपस्थिती होती.

सन २०१४ -१५ चा पुरस्कार वंदना कंकाळ यांना, सन २०१५-१६ चा पुरस्कार लक्ष्मी माहुरे यांना, सन २०१६-१७ चा पुरस्कार संध्या सरनाईक यांना आणि सन २०१७-१८ चा पुरस्कार एड. भारती सोमाणी यांना प्रदान करण्यात आला. चारही पुरस्कारार्थीना प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह,शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन जिल्हाधिकारी शण्मुगराजन आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पंत यांनी सन्मानीत केले. यावेळी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी बाळासाहेब सूर्यवंशी, परिविक्षा अधिकारी गजानन पडघन, प्रभारी जिल्हा संरक्षण अधिकारी बंडू धनगर, संरक्षण अधिकारी भगवान ढोले, सहायक लेखाधिकारी आलिशा भगत, लेखापाल प्रांजली चिपडे, कायदा तथा परिविक्षा अधिकारी जिनसाजी चौधरी यांची उपस्थिती होती.

Web Title: Four women honored with Ahilya Devi Holkar Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.